’कोरोना’तील सेवाकर्मींसाठी द्राक्षांची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:46 PM2020-04-01T15:46:51+5:302020-04-01T15:47:16+5:30

मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना येथून द्राक्षांची विनामूल्य रसद पुरविली जात आहे. बुधवारी (दि.०१) तीस क्विंटल द्राक्षे विशेष वाहनाने अंधेरी येथे रवाना करण्यात आले. कसबे सुकेणेतील गांधी आणि बोराडे परिवाराने दाखविलेल्या सेवाभावाचे परिसरात कौतुक होत आहे.

Grape logistics for Corona workers | ’कोरोना’तील सेवाकर्मींसाठी द्राक्षांची रसद

मुंबई येथे द्राक्षाने भरलेले वाहन रवाना करताना गांधी कुटुंबीय.

Next
ठळक मुद्देकसबे सुकेणे : गांधी व बोराडे कुटुंबीयांचा सेवाभाव

कसबे सुकेणे : मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना येथून द्राक्षांची विनामूल्य रसद पुरविली जात आहे. बुधवारी (दि.०१) तीस क्विंटल द्राक्षे विशेष वाहनाने अंधेरी येथे रवाना करण्यात आले. कसबे सुकेणेतील गांधी आणि बोराडे परिवाराने दाखविलेल्या सेवाभावाचे परिसरात कौतुक होत आहे.
जगभरात कहर माजविणाºया कोरोनाचा लढा मुंबईतही सुरू आहे. असंख्य डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक आणि मुंबई महापालिका कर्मचारी चोवीस तास कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यांना मदतकार्यात पाठबळ व विश्वास मिळावा यासाठी कसबे-सुकेणे येथील शेतकरी दत्ता पाटील यांनी गरिबांना पाच पोते गहू वाटप केला. हाच सामाजिक बांधिलकीचा धागा धरत रासायनिक औषधे व खतांचे व्यापारी सुमित गांधी यांनीही तब्बल तीस क्विंटल द्राक्षे मुंबईला पाठविली आहेत. मुंबईच्या अंधेरी येथील किशोर खाबिया, सुनील खाबिया, संजय कदम यांच्या मदतीने ही द्राक्षे मुंबईत वितरित केली जाणार आहेत. सुमित गांधी व पोपट बोराडे यांच्या द्राक्षबागेतील ही द्राक्षे मुंबईला पाठविली गेली आहेत.

परिवहनमंत्र्यांनी दिली परवानगी
कसबे सुकेणेच्या सुमित गांधी यांची ही संकल्पना परिवहनमंत्री अनिल परब यांना समजताच त्यांनी तत्काळ विशेष बाब म्हणून संबंधित वाहनाला परवानगी देत गांधी यांचे अभिनंदन केले. कोरोनाच्या मदतकार्यातील सेवाकर्मींना ही द्राक्षे पाठवायची असल्याने गांधी परिवारातील प्रत्येक सदस्याने पहाटे बागेत जाऊन द्राक्ष खुडणी करून ती वाहनामध्ये भरेपर्यंत सेवा दिली.

कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, पोलीस व आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या कार्याला पाठबळ व प्रेरणा म्हणून आम्ही द्राक्षे अंधेरीला मोफत वितरित करण्यासाठी पाठविली आहेत.
- सुमित गांधी, द्राक्ष उत्पादक, कसबे सुकेणे

Web Title: Grape logistics for Corona workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.