अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:53 PM2020-01-21T12:53:11+5:302020-01-21T12:53:46+5:30

पाटोदा - अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

 Grape production decreases due to premature ejaculation | अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

Next

पाटोदा ( गोरख घुसळे ):- अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केलेला खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्ष हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील अर्थकारणाची पूर्ण गतीच मंदावली आहे.
संकटे , शेतकरी आणि शेती हे समीकरण सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ हवामान धुके, दव यामुळे द्राक्षबागा रोगाच्या बळी ठरल्या आहे.अशाही परिस्थितीत शेतकºयांनी औषध फवारणी करून बागा जागविल्या मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याची थंडी व बागांवर साचणारे दविबंदू द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने सध्या काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष बागा खरेदीसाठीही व्यापारी धजावत नाही जरी व्यापारी खरेदी साठी आला तरी अत्यल्प दराने मागणी होत असल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली असून तो पूर्णता मेटाकुटीला आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सतत दुष्काळाशी दोन हात करणाºया येवला तालुक्यात या वर्षी वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने मोठया आनंदाने उधार उसनवार तसेच कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका तसेच सावकाराकडे गहाण ठेवून खरीप हंगामाची पेरणी तसेच द्राक्ष बागांची तयारी केली .काही दिवसात पिके चांगली आली मात्र आॅक्टोबर व नोव्हेंबर मिहन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या आनंदावर विरजण पडले हातातोंडाशी आलेली सर्व पिके खराब झाली.या अवकाळी पावसाने सप्टेंबर ,आॅक्टोबर मिहन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्ष बागा वाया गेल्या आहे .ज्या थोडयाफार बागा अवकाळीच्या तडाख्यातून वाचल्या आहे आशा बागांनाही उत्पन्नाचा मोठा फटका बसला असल्याने अवस्था बिकट झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी एकरी सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त खर्च केलेला असून एकरी सरासरी वीस टन उत्पन्न निघणे अपेक्षित होते मात्र या अवकाळी पावसामुळे फक्त पाच ते सात टन इतके अत्यल्प उत्पन्न निघत असून सरासरी बाजारभाव पंचवीस ते पन्नास रु पये दरम्यान मिळत असल्याने शेतकर्यांनी केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात कर्ज बाजरी झाला असून घेतलेले कर्ज व औषध दुकानदारांची देनेदारी कशी फेडायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

Web Title:  Grape production decreases due to premature ejaculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक