द्राक्षबागा, कांद्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:03 AM2018-06-22T01:03:49+5:302018-06-22T01:03:49+5:30
जायखेडा : परिसरात पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जायखेडा : परिसरात पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बुधवारी (दि.२०) दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी अचानक पावसाने जोरदार आगमन करून सर्वांनाच सुखद धक्का दिला; मात्र पावसाबरोबर आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जायखेडा येथील शेतकरी कैलास चौधरी यांच्या कांदा चाळीवर झाकलेला प्लॅस्टिक कागद उडाल्याने कांदे भिजून मोठे नुकसान झाले, तर चिंतामण ब्राह्मणकार या शेतकºयाच्या शेतातील शेडनेट उडून गेल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. याचप्रमाणे अनेक शेतकºयांना कमी-अधिक प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. पंचनामे सादरमानोरी : मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे येथील शेतकरी राजाराम शेळके व उत्तम वावधाने यांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांच्या गल्ल्यांचे अँगल वाकले, फळबाग झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. राजाराम शेळके यांचे पंधरा हजार, तर उत्तम वावधाने यांचे वीस हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी तलाठी दत्तात्रय टिळे यांनी पंचनामा केला असून, अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे.