गल्लोगल्ली दिसू लागल्या द्राक्ष, टरबुजाच्या हातगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:57 PM2020-03-30T16:57:51+5:302020-03-30T16:58:57+5:30

नाशिक : कोरोणा संसर्गाच्या पाशर््वभूमीवर लॉकडाऊन असल्याने छोटे व्यवसायिक व फळ विक्र ेत्यांची मोठी कुचंबणा झाली आहे. छोटे विक्र ...

 Grapefruits appeared, grapes of watermelons | गल्लोगल्ली दिसू लागल्या द्राक्ष, टरबुजाच्या हातगाड्या

गल्लोगल्ली दिसू लागल्या द्राक्ष, टरबुजाच्या हातगाड्या

Next

नाशिक : कोरोणा संसर्गाच्या पाशर््वभूमीवर लॉकडाऊन असल्याने छोटे व्यवसायिक व फळ विक्र ेत्यांची मोठी कुचंबणा झाली आहे. छोटे विक्र ेते व हातगाडीवरील विक्र ेत्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडून द्राक्षे , टरबूज व फळे खरेदी करून ठेवले असून आता रस्ते सुनसान झाल्यामुळे त्यांना आपला माल कसा विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मालाला उठाव नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकरी देखील टेम्पो मधून आपला माल विक्र ीसाठी आणून गल्लीबोळात फिरतांना दिसत आहेत. त्यामुळे एक-दोन आठवड्यापूर्वी द्राक्षाचे दर ६० ते ७० रु पये किलो असे होते आता ते दर घसरून ३० ते ४० रु पये या दराने विक्र ी होत आहेत. टरबूज , खरबूज आणि अन्य फळांची देखील हीच अवस्था आहे. किरकोळ विक्र ेत्यांच्या मालाला उठाव नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. हातावर पोट असणाºया या छोट्या व्यावसायिकांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

Web Title:  Grapefruits appeared, grapes of watermelons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.