विद्युततारा कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त
By Admin | Published: March 22, 2017 12:12 AM2017-03-22T00:12:10+5:302017-03-22T00:12:24+5:30
दिंडोरी : पॉवरग्रीड वाहिनीचे काम सुरू असताना विद्युततारा द्राक्षबागेवर कोसळल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त होऊन सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना राजापूर येथे घडली.
दिंडोरी : पॉवरग्रीड वाहिनीचे काम सुरू असताना विद्युततारा द्राक्षबागेवर कोसळल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त होऊन सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना राजापूर येथे घडली. याबाबत प्रांताधिकारी उदय किसवे यांना निवेदन देण्यात आले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आमदार नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीची पाहणी केली असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. असे प्रकार घडण्याची भीती होती म्हणूनच शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध होता. प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्या व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार झरिवाळ यांनी केली आहे. राजापूर येथील शिवारातील गट नंबर ५७ मध्ये पॉवरग्रीडच्या टॉवरची उभारणी चालू असताना टॉवर उभे करण्यासाठी बांधलेला दोरखंड शेजारी असलेल्या बागेवरून जात असल्याने टॉवर बॅलन्स करताना दोराचा वापर करीत होते. त्यावेळेस मी याची पूर्वकल्पना वेळोवेळी व्हॉट्सअॅपद्वारे पॉवरग्रीड अधिकारी सिंग यांना छायाचित्र व एसएमएसद्वारे देत होतो. परंतु त्यांनी दखल न घेतल्याने आमच्या बागेचे संपूर्ण नुकसान झाले आहे. म्हणजे पूर्ण ४० गुंठे (एक एकर) क्षेत्रातील निर्यातक्षम बाग भुईसपाट झाल्या आहेत. बागांचे अॅँगल व तारा कुठल्याही प्रकारे उपयोगात येणार नाही. बाग संपूर्णपणे नाहीसी झाली आहे. द्राक्षबागेची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी दिनकर व वसंतराव देवकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)