द्राक्षाचे मनुके, कांद्याचा झाला वांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:09 PM2020-05-21T21:09:38+5:302020-05-21T23:26:14+5:30
जळगाव नेऊर : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरिपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतकºयांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकºयांना बसला. वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली द्राक्षे मातीमोल भावाने विकावी लागली. यामुळे झालेला खर्चदेखील वसूल झाला नाही. काही शेतकºयांच्या द्राक्षबागेत झाडावरच मनुके तयार झाली, तर अनेक शेतकºयांनी आहे त्या द्राक्षबागा खाली केल्या. द्राक्षांपाठोपाठ कांदा भाव कोसळले.
आता, बाजार समित्या सुरू झाल्या; पण मिळणाºया भावाने शेतकºयांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्याचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अनेक शेतकºयांनी आपल्या भाजीपाला पिकावर नांगर फिरवला तर काही शेतकºयांनी भाजीपाला शेतात जनावरे सोडून दिली. कोरोनाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांपुढे खरिपाच्या भांडवलाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
-----------------------
बाजार समिती बंद
निर्यात खुली होण्याच्या आशेवर अनेक शेतकºयांनी कांदा
साठवला आणि ऐनवेळी कोरोनाचा प्रकोप वाढला. लॉकडाउन, संचारबंदीत बाजार समिती चालू-बंद राहिल्याने
कांदा उत्पादक शेतकºयांना
मिळेल त्या दराने कांदा विक्र ी करावा लागला.
------------------------
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोबीचे हजार कंद घेऊन गेलो असता कवडीमोल दरात, म्हणजे एक कोबी कंदाला एक रु पया तर काही कंद पन्नास पैसेप्रति विकला गेला. गाडीचे भाडे अठराशे रु पये होते. परत येतांना निम्मा कोबी जनावरांना टाकून दिला. अशा परिस्थितीत खरीप पिके उभी कशी करायची?
- अर्जुन दाते, शेतकरी