परतीच्या पावसातून वाचविलेली द्राक्षे युरोपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:46 PM2020-02-14T22:46:25+5:302020-02-15T00:14:13+5:30
भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.
जळगाव नेऊर : भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.
गणेश वरे यांनी दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेऊन यावर्षी उत्कृष्ट गुणवत्तेचा माल निर्यात योग्य द्राक्ष उत्पादन घेऊन युरोप येथील बाजारपेठेत पाठविला. आपल्या शेतात सतत नवनवीन पिकांची लागवड करून नवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून गणेश वरे यांची ओळख आहे. त्यांनी शेतात कारले, भोपळे, टमाटे, मेथी, कोथिंबीर, मका, कांदे, द्राक्ष अशा विविध पिकांची लागवड करीत निरीक्षण, प्रयोग व अद्ययावत तंत्राच्या माध्यमातून शेती फुलविली आहे.
इच्छाशक्तीची जोड असल्यास कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. बाजारात मालाला दर कमी असले तरी अधिक उत्पन्न व उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर चांगला पैसा कमविता येतो. आता यापुढे आधुनिक तंत्र वापरून संधीचा शोध घेऊन योग्य पिकाची निवड करून शेतात वेगवेगळी पिके घेऊन आर्थिक प्रगती करता येईल, असे गणेश वरे सांगतात.
प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन, मीडियाचा तसेच स्थानिक कृषी सेवा केंद्रांचा सल्ला घेऊन योग्य व कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य झाले आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे फळ नक्कीच मिळते. परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेली बाग मेहनतीने सावरली असून, गुणवत्तेची द्राक्ष युरोपला निर्यात केल्याचे समाधान मिळत आहे.
- गणेश वरे, द्राक्ष उत्पादक, पुरणगाव