थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी थांबली, वातावरण बदलाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:35 AM2018-01-29T04:35:51+5:302018-01-29T04:36:01+5:30

अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.

 Grapes stopped due to cold, the crisis of climate change | थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी थांबली, वातावरण बदलाचे संकट

थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी थांबली, वातावरण बदलाचे संकट

Next

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.
बेमोसमी पावसानंतर ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला. आता थंडीमुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी दिवसा उष्मा, तर रात्री काहीसे थंड वातावरण, याचा फटका द्राक्षांना बसला. ढगाळ वातावरणामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला होता. हे संक ट टाळण्यासाठी शेतकºयांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, आता नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षांना अपेक्षित भाव न मिळाल्यास शेतकºयांची आर्थिक कोंडी होईल.

दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्याने, द्राक्षाच्या रंगावरही परिणाम होत आहे. तो अधिक वेळ टिकत नाही. द्राक्षांमध्ये साखर भरण्याची प्रक्रिया अत्यल्प गतीने होत आहे. मण्यांचा आकार वाढण्यासाठीही प्रतिकूल वातावरण असल्याने काढणी लांबण्याची शक्यता आहे.
- मदन पिंगळे, संचालक, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

Web Title:  Grapes stopped due to cold, the crisis of climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.