रेल्वेअभावी बांगलादेशाला द्राक्षांची चव आंबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:48+5:302021-03-17T04:15:48+5:30

दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान खासदार पवार यांनी अनुदानाच्या मागणीवर बोलताना ही मागणी केली. शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वेच्या माध्यामातून ...

Grapes taste sour in Bangladesh due to lack of railways | रेल्वेअभावी बांगलादेशाला द्राक्षांची चव आंबट

रेल्वेअभावी बांगलादेशाला द्राक्षांची चव आंबट

Next

दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान खासदार पवार यांनी अनुदानाच्या मागणीवर बोलताना ही मागणी केली. शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वेच्या माध्यामातून शेतीमालाच्या दळणवळणासाठी एक अतिशय उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने जाणाऱ्या शेतमालावर ५० टक्के अनुदान मिळत असल्याने, शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचे द्राक्ष व कांद्याची बांगलादेशामध्ये निर्यात केली जाते, परंतु त्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने नाशिकहून बांगलादेशकरिता एक विशेष रेल्वेगाडी किंवा वॅगनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणारे प्रवासी व पासधारकांची संख्या जास्त प्रमाणात आहे, परंतु कोरोनामुळे ज्या विशेष रेल्वे सुरू आहेत, त्यापैकी एकही रेल्वे नांदगाव स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने, रेल्वेला नांदगावाला थांबा द्यावा, तसेच नाशिकहून मोठ्या प्रमाणात प्रवासी तिरुपती व अजमेरला दर्शनासाठी जात असतात. त्यांच्याकरिता नाशिक ते तिरुपती व नाशिक ते अजमेरसाठी विशेष रेल्वेची सुविधा प्रदान करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Grapes taste sour in Bangladesh due to lack of railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.