उगावच्या खरेदी केंद्रावर द्राक्षेमणी लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 06:35 PM2021-02-17T18:35:06+5:302021-02-17T18:39:23+5:30
लासलगांव : द्राक्षे पंढरी म्हणुन ओळख असलेल्या उगांव, ता. निफाड येथील खरेदी-विक्री केंद्रावर चालु हंगामातील द्राक्षेमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल होते.
लासलगांव : द्राक्षे पंढरी म्हणुन ओळख असलेल्या उगांव, ता. निफाड येथील खरेदी-विक्री केंद्रावर चालु हंगामातील द्राक्षेमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल होते.
प्रारंभी जगताप यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर विजय मापारी यांचा द्राक्षेमणी २७ रुपये प्रती किलो या दराने विक्री झाला.
लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सदस्य मंडळाने परीरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार दि. २६ जानेवारी, २००४ पासुन मौजे उगांव येथे द्राक्षेमणी खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे. गेल्या १७ वर्षात येथील केंद्रावर १४,५०,५१४ क्रेटस्मधुन २,९०,१०२.८० क्विंटल द्राक्षेमण्यांची विक्री झाली.
सदरचे केंद्र सुरू झाल्यापासुन येथील द्राक्षे उत्पादकांना फक्त द्राक्षेमण्यांच्या विक्रीतुन ३४ कोटी ८७ लाख ७९ हजार ५९३ रूपये उत्पन्न मिळाले असुन दरवर्षी स्पर्धात्मक बाजारभाव मिळत असल्याने द्राक्षेमणी विक्रीसाठी उत्पादक उगांव केंद्रालाच पसंती देत आहे. यावेळी जगताप, मोगल, निफाड शेतकरी संघाचे सदस्य मधुकर ढोमसे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी सुवर्णा जगताप यांची लासलगांव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व नरेंद्र वाढवणे यांची बाजार समितीच्या सचिवपदी नेमणुक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
बाजार समितीने मौजे उगांव येथे केवळ द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी खरेदी-विक्री केंद्र सुरू न ठेवता परीसरात स्वमालकीची प्रशस्त जागा घेऊन सांगली / तासगांवच्या धर्तीवर बाजार समितीच्या माध्यमातुन चांगल्या द्राक्षांच्या खरेदी-विक्रीसाठी एक नियंत्रित बाजारपेठ सुरू करावी व तेथे चांगले द्राक्षे, द्राक्षेमणी, बेदाणा / मणुका आणि सेंद्रीय फळे व भाजीपाल्याचे लिलाव सुरू करून स्पेशल कमोडिटी मार्केट निर्माण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.