द्राक्षबागांना अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:25 AM2019-12-26T00:25:48+5:302019-12-26T00:26:58+5:30

पिंपळगाव बसवंत : गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना पिंपळगाव बसवंत परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका द्राक्षबागांना बसला असून, उत्पादक धास्तावले आहे.

The grapevines strike out prematurely | द्राक्षबागांना अवकाळीचा तडाखा

पिंपळगाव बसवंत परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षबाग वाचविण्यासाठी औषध फवारणी करताना शेतकरी

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसंवत परिसराला फटका; उत्पादक चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना पिंपळगाव बसवंत परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका द्राक्षबागांना बसला असून, उत्पादक धास्तावले आहे.
पिंपळगाव बसवंतसह मुखेड, अंतरवेली, पाचोरे वणी, बेहड, कारसूळ, दावचवाडी, शिरवाडे वणी आदी भागात मुसळधार पाऊस झाला. जिल्हाभरात सकाळी ऊन तर दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अजूनही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिसरात अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने साखरझोपेत असलेल्या शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील द्राक्षबाग
पट्ट्यात पडलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.
९० टक्के द्राक्षबागा फुलोरावस्था पार करून पाणी उतरण्याच्या स्थितीत होत्या त्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. हा पाऊस द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठला असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पहाटे झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे सकाळपासूनच बागांवर फवारणी करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धांदल उडाल्याचे चित्र द्राक्ष पट्ट्यात पहावयास मिळाले.
दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाने थैमान घालून दुष्काळाची स्थिती निर्माण करून शेतकऱ्यांचे नव्हे तर शेतीवर आधारित असलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या जखमी ताज्या असतानाच बुधवारी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या कित्येक दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने केव्हाही पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासादायक असला तरी द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे. या पावसामुळे फुलोºयातील द्राक्षबागांचे नुकसान होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक सांगत आहेत. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही शेतकºयांची अतोनात हानी झाली होती.

Web Title: The grapevines strike out prematurely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.