अडीच हजार एकरवरील द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:30 PM2019-03-21T12:30:59+5:302019-03-21T12:31:16+5:30

पाटोदा (गोरख घुसळे) : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका या भागातील असलेल्या द्राक्ष, डाळिंब व इतर फळ बागांना बसला आहे.

Grapple and pomegranate garden hazard in two and a half thousand acres | अडीच हजार एकरवरील द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात

अडीच हजार एकरवरील द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात

Next

पाटोदा (गोरख घुसळे) : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका या भागातील असलेल्या द्राक्ष, डाळिंब व इतर फळ बागांना बसला आहे. पाण्याअभावी पाटोदा मंडळातील सुमारे अडीच हजार एकर वरील द्राक्ष, डाळिंब,पेरू, चिकू, व अँपल बोर इत्यादी फळ बागा धोक्यात आल्या असून त्या शेवटच्या घटका मोजत आहे. तर शेकडो एकरवरील बागा करपल्या आहेत. पाण्याअभावी जळून गेलेल्या शेकडो एकरवरील द्राक्ष व डाळिंब बागा शेतकऱ्यांनी कुºहाडीच्या सहाय्याने तोडून टाकत भुईसपाट केल्या असून हा बागा तोडण्याचा प्रकार आजही सुरूच असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. या फळबागा वाचविण्यासाठी पालखेड कालवा विभागाने सध्या सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाला जोडून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देऊन या भागातील बागा वाचविण्यासाठी मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. पाटोदा कृषी मंडळात सर्वाधिक क्षेत्र हे द्राक्ष बागेचे असून याखालोखाल डाळिंब बागेचे क्षेत्र आहे. या भागात या वर्षी झालेल्या अल्पशा पावसामुळे भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी व तलाव यांना थेंबभरही पाणी शिल्लक नाही. बोअरवेलने केव्हाच माना टाकल्या आहेत.त्यातच गेल्या काही दिवसांपासून तापमानात रोजच वाढ होत आहे, त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्नही बिकट बनत चालला आहे. अनेक वर्षांपासून पोटच्या मुलांबाळा प्रमाणे जतन केलेल्या शेतातील फळबागा पाण्याअभावी जळून चालल्या असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

Web Title: Grapple and pomegranate garden hazard in two and a half thousand acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक