द्राक्षे चोरली म्हणून नाशिकला अल्पवयीन मुलांना विवस्र करून पाठविले घरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:54 AM2019-02-24T00:54:20+5:302019-02-24T00:54:42+5:30
पंचवटी भागातील एका द्राक्षबागेतून शनिवारी दुपारी दोघा १० ते १२ वयोगटांतील अल्पवयीन मुलांनी द्राक्षे चोरल्याने कामगारांनी त्यांना पकडून त्यांना विवस्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
नाशिक : पंचवटी भागातील एका द्राक्षबागेतून शनिवारी दुपारी दोघा १० ते १२ वयोगटांतील अल्पवयीन मुलांनी द्राक्षे चोरल्याने कामगारांनी त्यांना पकडून त्यांना विवस्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
घटनेनंतर रडत रडत रस्त्याने जाणाऱ्या विवस्र मुलांना एका पोलीस कर्मचाºयाने बघितले. त्याने घटनेची माहिती घेतली व द्राक्षबागेतील कर्मचाºयांना पोलिसी भाषेत दरडावले. त्यानंतर त्या मुलांचे कपडे परत केले व नंतर दोघे अल्पवयीन घराकडे रवाना झाले. द्राक्षबागेत खुडा सुरू आहे. काही दिवसांपासून परिसरातील मुले शेताजवळून जाताना कॅरेटमधील द्राक्षे काढून नेतात, अशी द्राक्ष बागायतदाराची तक्रार आहे. दोन ते तीन वेळा द्राक्षे चोरण्याचा प्रकार घडल्यानंतर शनिवारी दुपारच्या वेळी पुन्हा असाच प्रकार घडला. त्यावेळी कामगारांनी अल्पवयीन मुलांना पकडले व त्यांना चोपही दिला. त्यानंतर जवळील प्रसाधन गृहाशेजारी नेऊन त्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना विवस्त्र केले व तसेच पाठवून दिले. रस्त्याने जाणाºयांना ही मुले विवस्त्र का जात आहेत, हे लक्षात आले नाही. ही मुले द्राक्षबागेतून द्राक्षे चोरतात, अशी तक्रार त्यांच्या कुटुंबीयांकडे करण्यात आली होती. मात्र मुले लहान असल्याने समजून घ्या, असा सल्ला त्यांच्या कुटुंबीयांनी दिला होता, असे कामगारांनी सांगितले.
द्र्राक्षचोरी केली म्हणून त्या मुलांच्या अंगावरचे कपडे काढून विवस्र केले गेल्याने परिसरात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रकाराची पोलीस स्वत:हून दखल घेऊन दोषींवर पोलीस कारवाई करणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
शनिवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीने मुले रस्त्याने विवस्र जात होती. लोक त्यांच्याकडे पाहत होते, मात्र अल्पवयीन मुलांना मारहाण करून विवस्र केल्याची कोणालाही माहिती नव्हती.
द्राक्षबागेच्या परिसरातून जात असताना दोन मुलांनी केवळ द्राक्ष चोरले म्हणून त्यांना पकडण्यात आले आणि त्यांचे कपडे काढून घेण्यात आले. तसेच मुलांना मारहाण करण्यात आली, ही गंभीर बाब आहे.
- अमित भोईर, प्रत्यक्षदर्शी