धान्य दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने धान्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:47 PM2018-09-29T17:47:34+5:302018-09-29T17:48:12+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी येथील स्वस्त धान्य दुकानात शिरल्याने दुकानातील धान्याची नासाडी झाली आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी येथील स्वस्त धान्य दुकानात शिरल्याने दुकानातील धान्याची नासाडी झाली आहे.
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मार्फत रेशन वाटपाचे स्वस्त धान्य दुकान आहे. विकास संस्थेशेजारीच नव्याने बांधण्यात येत असलेल्या तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरु आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वीजेच्या कडकडाटा मुसळधार पाऊस झाला. संस्थेच्या आवारात वाळू, खडी, विटा टाकलेल्या असल्याने अचानक आलेल्या पावसाच्या लोंढ्याने थेट विकास संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात पाणी शिरले. स्वस्त धान्य दुकानातील चार क्विंटल गहू तर तीन क्विंटल तांदूळाची नासाडी झाल्याचे समजते. शनिवारी सकाळी सरपंच सीमा शिंदे, ग्रामसेवक डी. एस. भोसले, ए. टी. शिंदे, सुदाम भालेराव, दशरथ शिंदे आदीनी दुकानाची पाहाणी करून नुकसान झालेल्या मालाचा पंचनामा केला.