महाआरतीने गोदावरीविषयी कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:18 AM2017-09-25T00:18:23+5:302017-09-25T00:18:28+5:30
जागतिक नदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची जीवनदायिनी गोदावरी नदीची महाआरती करून आदरभाव व्यक्त करण्यात आला.
नाशिक : जागतिक नदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची जीवनदायिनी गोदावरी नदीची महाआरती करून आदरभाव व्यक्त करण्यात आला. पर्यावरणप्रेमींच्या सनविवि फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी गेल्या काही वर्षांपासून चळवळ सुरू असून, सिंहस्थ कालावधीतही नदीपात्रातील प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न अनेकार्थाने यशस्वी ठरले. मात्र आताही त्याच पद्धतीने जनजागृती व्हावी यासाठी या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारच्या उपक्रमातून गोदावरी नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी सातत्याने अशाप्रकाराच्या महाआरतीचा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी राजेश पंडित, धीरज बच्छाव, मयूरी बिरारी, डॉ. स्नेहा बच्छाव, डॉ. संकेत चव्हाण, प्रीतेश जाधव, केयूर कुलकर्णी, अजिंक्य करंजुले आदी उपस्थित होते.