विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओतली खडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:45 PM2024-07-08T18:45:15+5:302024-07-08T19:23:40+5:30

बिटको ते जेलरोड रस्ता जलवाहिनीसाठी खोदून अनेक दिवसापासून काम अर्धवट स्थितीत आहे. 

Gravel poured at the entrance of the divisional office | विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओतली खडी

विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओतली खडी

- मनोज मालपाणी

नाशिकरोड : परिसरात अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही, जलवाहिनी आणि गॅस पाईप लाईन साठी खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. महापालिकेने त्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी मनसेने महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खडी ओतून निषेध व्यक्त केला. बिटको ते जेलरोड रस्ता जलवाहिनीसाठी खोदून अनेक दिवसापासून काम अर्धवट स्थितीत आहे. 

जयभवानी रोड, सिन्नरफाटा, मोटवाणी रोड, गंधर्वनगरी, विहितगांव, जेलरोड, सद्गुरू नगर, भालेराव मळा, जगताप मळा व इतर ठिकाणी विविध कामाकरिता खोदाई करून रस्ते व्यवस्थित बुजवले नाही. पावसामुळे कॉलनी रस्ते उखडले आहे. एमजीएनएल कंपनीच्या गॅस पाइप लाईन कामासाठी कॉलनी रस्ते खोदण्यात आले. काम झाल्यानंतर ठेकेदारांनी मुरूम माती टाकून रस्ते बुजविल्याने कॉलनीमधील रस्त्यांची पातळी बिघडली असून पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत आहे. अनेक ठिकाणच्या गतिरोधकांमध्ये खड्डे पडल्याने वाहने आपटत आहे. 

मनपा बांधकाम विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालय समोर खडी ओतून निषेध व्यक्त केला. याबाबत मनपा विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शहर संघटक अॅड. नितीन पंडित, विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, पूर्व निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, मनविसेचे शशी चौधरी, बाजीराव मते, नितीन धानापुणे, महिला शहर अध्यक्ष भानुमती अहिरे, मीरा आवारे, विजय बोराडे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Gravel poured at the entrance of the divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक