आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:28+5:302021-04-24T04:14:28+5:30
या नाक्यावर दोन पोलीस कर्मचारी, २ शिक्षक कर्मचारी व एक आरोग्य कर्मचारी यांची १२ तासांसाठी नियुक्ती करण्यात येत असून, ...
या नाक्यावर दोन पोलीस कर्मचारी, २ शिक्षक कर्मचारी व एक आरोग्य कर्मचारी यांची १२ तासांसाठी नियुक्ती करण्यात येत असून, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनधारक व प्रवाशांची तपासणी करून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल बघूनच प्रवेश दिला जात आहे. शिवाय अत्यावश्यक कारण नसताना प्रवेश करणाऱ्या दुचाकीस्वारांना माघारी पाठविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसांसोबत याच नाक्यावर गुजरात राज्यानेही आपली टीम तैनात केली असून, महाराष्ट्रातून गुजरात राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. नाशिकहून याच मार्गे वापी, धरमपूर, बलसाड, सेल्वास येथे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला वाहतूक केली जात असून, रात्रीच्या वेळी शेकडो वाहने या तपासणी नाक्यावरून ये- जा करत असतात.
फोटो - २३ पेठ नाकाबंदी
गुजरात राज्य पोलिसांनी लावलेला तपासणी नाका.
===Photopath===
230421\23nsk_14_23042021_13.jpg
===Caption===
फोटो - २३ पेठ नाकाबंदी गुजरात राज्य पोलीसांनी लावलेला तपासणी नाका