निफाड येथे महाअवयवदान रॅली

By Admin | Published: September 2, 2016 10:37 PM2016-09-02T22:37:56+5:302016-09-02T22:38:11+5:30

निफाड येथे महाअवयवदान रॅली

The Great Admissions Rally at Niphad | निफाड येथे महाअवयवदान रॅली

निफाड येथे महाअवयवदान रॅली

googlenewsNext


निफाड : उपजिल्हा रुग्णालय निफाड आणि पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महाअवयवदान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समिती येथून या रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीस निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत वैनतेय विद्यालयाचे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली निफाड नगरपंचायत येथे आल्यानंतर या ठिकाणी रॅलीची सांगता झाली. याप्रसंगी निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंंग चव्हाण, विस्तार अधिकारी रवींद्र लोखंडे, डॉ. सुनीता ढेपले, शारदा भामरे, संतोष नवले, समुपदेशक नितीन परदेशी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक जनार्दन परदेशी, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरहरी सानप, पुनीमा कोंडके, वैनतेय विद्यालयाचे शिक्षक एस. एस. सूर्यवंशी, प्रफुल्ल देवरे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक भामरे यांनी केले, तर डॉ. राठोड व डॉ. ढेपले यांनी सध्याच्या काळात असलेले अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले व अवयवदान कसे व कोठे, केव्हा करता येते याची माहिती दिली. नितीन परदेशी यांनी आभार मानले. विशेष म्हणजे, अवयवदान करण्यासाठी पहिली नावनोंदणी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: The Great Admissions Rally at Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.