जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:00 PM2020-09-15T23:00:12+5:302020-09-16T00:58:13+5:30
एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
दारणा नदिवर जाखोरी गावाजवळ पुल बांधलेला आहे. हा रस्ता शिंदे येथील पुणा हायवेपासून ओझरच्या दहावा मैलाजवळ आग्रा हायवेला मिळतो. जाखोरी गावालगत असलेल्या शेतालगत रस्ता होण्यापूर्वी मोठा नाला होता. त्यामुळे उताराने पाणी वाहत येऊन या नाल्यामधून नदीला मिळत असे. मात्र या हायवेचे काम सुरु झाले. रस्ता तयार झाला. त्यामुळे मुळ नाला बुजला गेला.पर्यायाने पावसाळ्यात शेतांमधून उताºयाने वाहून येणारे पाणी पुला लगतच्या विठोबा महिपती जगळे यांच्या गट नंबर 536 मधून वाहत असल्याने दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुमारे आठ ते दहा किलोमिटर परिसरातील उतारावरचे पाणी वाहत आल्याने दारणा नदीवरील पुलालगत असलेल्या जगळे यांच्या शेतातील माती खचून वाहून जाऊन सुमारे दोन गुंठे जागेत मोठे भगदाड पडले.त्यामुळे शेजारील पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या भगदाडापासून दहा- पंधरा फुटाच्या अंतरावर महापारेषण कंपनीचा मोठा टॉवर आहे. जमिन भुसभुसित असल्याने अजुन एखादा मोठा पाऊस पडला तर जमिन खचत जाऊन या टॉवरलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकिकडे पुल आणि दुसरीकडे टॉवर अशा दुहेरी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्त्याचे काम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी नाला पूर्ववत करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.वरच्या बाजुला जाखोरी ब्राम्हणवाडे रस्त्याच्या पलीकडून उतावर असलेल्या संतोष ताजणे, तुकाराम कटाळे, किशोर कटाळे, नारायण ताजणे, शरद ताजणे, सैय्यद, शेलार, जगळे, पगारे, बागुल यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहत येऊन विठोबा महिपत जगळे यांच्या शेतात साचल्याने तेथील माती झिजून नदीत प्रवाहित झाल्याने मोठे भगदाड पडले आहे.या भगदाडात सुमारे 40-45 ट्रक माती भरावी लागेल.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली तयार करुन रस्त्याला कठडे तयार करावेत अशी मागणी स्वप्नील जगळे यांनी केली आहे.
दारणेच्या पुलालगत आमची शेती आहे. पूर्वी येथे मोठा नाला असल्याने पाणी वाहून जात होतो. मात्र रस्त्याच्या कामामुळे नाला बुजला गेला.त्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरुन नुकसान होते.वारंवार पाठपुरावा करुनही नाला पूर्ववत केला जात नाही. पावसाने गट नंबर 536 मध्ये मोठे भगदाड पडले. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी.
-परशराम विठोबा जगळे, जाखोरी.