कामगारांचा मोठा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:19 AM2019-10-19T00:19:32+5:302019-10-19T00:19:51+5:30

बदलत्या सामाजिक, आर्थिक स्थितीमुळे नाशिक शहर कॉस्मोपोलिटन सिटी बनले आहे. त्यामुळे स्थानिक म्हणजे मूळ नाशिकशिवाय राज्यातून आणि राज्याबाहेरून आलेल्या मतदारांची भूमिकासुद्धा निर्णायक ठरत आहे. सातपूर भागात उत्तर भारतीयांची संख्या अधिक असून, पंचवटीत गुजराथी, तर नाशिकरोड भागात बंगाली समाज अधिक आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे सिडकोत खान्देश पट्टादेखील प्रभावी आहे. त्यामुळे या अन्य प्रांतांतील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे.

Great impact of the workers | कामगारांचा मोठा प्रभाव

कामगारांचा मोठा प्रभाव

Next
ठळक मुद्देउमेदवारांची धावपळ : सातपूरला उत्तर भारतीय, पंचवटीत गुजराथी बांधव

नाशिक : बदलत्या सामाजिक, आर्थिक स्थितीमुळे नाशिक शहर कॉस्मोपोलिटन सिटी बनले आहे. त्यामुळे स्थानिक म्हणजे मूळ नाशिकशिवाय राज्यातून आणि राज्याबाहेरून आलेल्या मतदारांची भूमिकासुद्धा निर्णायक ठरत आहे. सातपूर भागात उत्तर भारतीयांची संख्या अधिक असून, पंचवटीत गुजराथी, तर नाशिकरोड भागात बंगाली समाज अधिक आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे सिडकोत खान्देश पट्टादेखील प्रभावी आहे. त्यामुळे या अन्य प्रांतांतील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे.
मूळ नाशिककर २३ गावठाणात त्याचबरोबर गावठाणाबाहेरील वस्त्यांमध्ये विखुरला गेला आहे. तथापि, रोजगार आणि उद्योगाच्या निमित्ताने नाशिक शहरात अन्य भागांतून येणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. स्थानिक पातळीवर चांदवड, कसमा पट्टा आणि रोजगारासाठी आदिवासी शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु धुळे, जळगाव भागातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघ त्यात खान्देशी किंवा कसमा पट्ट्यातील मतदारांच्या प्रभावासाठी ओळखला जातो. परंतु त्याचबरोबर सांगली-कोल्हापूर-सातारा या साकोसा पट्ट्यातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये वास्तव्याला आहेत. सोलापूर, परभणी आणि जालना या भागातून बांधकाम व्यवसायात किंवा मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आले आहेत.
नाशिक शहरात परप्रांतीयांची संख्यादेखील मोठी असून, सातपूर लिंक रोड आणि सातपूर, शिवाजीनगर, धु्रवनगर, गणेशनगर, कामगारनगर याठिकाणी उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा भाग नेहमीच राजकीय पक्षांच्या पटलावर असतो. त्याचप्रमाणे पंचवटी भागात गुजराथी बांधवांची संख्या अधिक आहे. वर्षानुवर्षे नाशिकमध्ये वास्तव्याला असल्याने ते आता नाशिककर झाले आहेत. परंतु त्यांचीदेखील व्होट बॅँक आहे. बंगाली समाजाचे प्रभाव क्षेत्र नाशिकरोड भागात असले तरी सुवर्णकारांकडे असलेले कारागीर विखुरलेल्या स्वरूपात आहेत.
गोड आणि खाºया मिठाईच्या व्यवसायात असलेले राज्यात प्रामुख्याने राजस्थानी व्यावसायिक आहेत. अशाप्रकारचे अनेक भागातील व्यावसायिक नाशिक शहरात स्थिरावले आहेत. निवडणुकीत या सर्वच बाबींचा विचार करावा लागत असल्याने उमेदवारांची प्रचारासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते.
अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्ष झाले थंड
देशातील अन्य प्रादेशिक पक्षांनी अनेकदा येथे बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला; परंतु ते फार यशस्वी होऊ शकलेले नाही. काही पक्षांनी राष्टÑीय पक्ष होण्याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत. परंतु नंतर ते थिटे पडले. बसपा (मायावती यांचा पक्ष) राष्टÑीय जनता दल (लालू प्रसाद यादव यांचा पक्ष) लोकजन शक्ती पार्टी (रामविलास पासवान यांचा पक्ष) अशा अनेक पक्षांनी प्रयत्न करून बघितले आहेत.
मनसे-शिवसेनेने मराठीचा मुद्दा आळवला, मात्र कॉँग्रेस, भाजप असे मानत नाही. नंतर शिवसेनादेखील उत्तर भारतीयांचे कौतुक करू लागली. या सर्वांत भाजपने मात्र आपल्या संघटनातच उत्तर भारतीय आघाडी आणि गुजराथी आघाडी अशा प्रांतनिहाय आघाड्या करून ठेवल्या आहेत. भाजपच्या व्यतिरिक्त अन्य पक्षांत अशाप्रकारची योजना नाही.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या त्या भागातील नेत्यांच्या सभा आवर्जून घेतल्या जातात. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि आताही पंतप्रधान होण्यापूर्वी आणि नंतर पंचवटीत सभा घेतात. गुजराथी मतदारांची सोय यानिमित्ताने बघितला जातो. लोकसभा निवडणुकीतच सिडकोत शिवसेनेने गुलाबराव पाटील यांची सभा घेतली होती. अशाप्रकारचे नेहमीच लक्ष ठेवून प्रचार केला जातो. यापूर्वी सातपूर परिसरात लालू प्रसाद, रामविलास पासवान यांच्या सभा झाल्या आहेत.

Web Title: Great impact of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.