राज ठाकरे यांना मोठा दिलासा; जळगाव न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:10 PM2022-02-11T19:10:16+5:302022-02-11T19:10:37+5:30

Raj Thackeray Acquitted : या गुन्हयाच्याकामी पोलिसांनी १३ जानेवारी २००९ रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले.

Great relief to Raj Thackeray; Jalgaon court acquitted | राज ठाकरे यांना मोठा दिलासा; जळगाव न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

राज ठाकरे यांना मोठा दिलासा; जळगाव न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

googlenewsNext

जळगाव - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे रेल्वेत मराठी माणसांची भरती करण्यात यावी. यासाठी केलेल्या आदोलन केल्यामुळे त्यांना २१ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच तारखेला जळगाव येथे मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेत्वृत्वाखाली वकील जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट परिसरात डिजीटल बॅनरवर फाशी दया लालू आधी जोडे मारा साल्याला " असे लिहून घोषणाबाजी केली. त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदरचे आंदोलन दिसले असता आणि आंदोलन करणारे यांना पोलिस दिसले असता त्या ठिकाणी पळापळ होऊन वाहनांचे नुकसान झाले म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्टेबल श्यामकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासह इतरांचे विरूध्द २१ ऑक्टोबर २००८ रोजी भा.दं.वि.कलम १४३, १४७,४२७,१०९, मुंबई पोलिस ऍक्टचे कलम १३५ तसेच महाराष्ट्र डॅमेज ऍक्टचे कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

या गुन्हयाच्याकामी पोलिसांनी १३ जानेवारी २००९ रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले. या खटल्याचे कामी राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींना समन्सची बजावणी झाली. नंतर न्यायालयात ६ एप्रिल २०१३ रोजी सुनावणी झाली असता राज ठाकरे आणि इतर आरोपी यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. त्यावेळी राज ठाकरे आणि  इतरांसाठी वकील केतन जे. ढाके यांनी काम पाहिले होते. या खटल्याच्याकामी राज ठाकरे यांना वैयक्तीक हजेरीपासून सूट देण्यात आलेली होती. पुढे या खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाले.

या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीसह इतर पोलीस कॉन्टेबल पंच व वाहनांचे नुकसान झालेले नागरिकांची साक्ष घेण्यात आल्या. एकंदरीत न्यायालयासमोर आलेला पुरावा पाहता व खटल्याचे कामी आरोपी पक्षाकडून केलेला युक्तीवाद लक्षात घेता आज प्रथम वर्ग न्यायंदडधिकारी जळगाव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, वकील जमील देशंपाडे, प्रेमानंद जाधव, यासीन रज्जाक यांची या गुन्हयातून निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याच्याकामी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतरांसाठी वकील.संदीप गोकुळ पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Great relief to Raj Thackeray; Jalgaon court acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.