मिरचीचा तोरा वाढला; पेट्रोल-डिझेलपेक्षा झाली महाग; जाणून घ्या, 'या' भाज्यांचा दर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 03:02 PM2022-02-06T15:02:01+5:302022-02-06T15:07:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या आवकेवर परिणाम झाला असल्याने किरकोळ बाजारात मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. पाच रुपयांच्या मिरच्या ...
गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या आवकेवर परिणाम झाला असल्याने किरकोळ बाजारात मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. पाच रुपयांच्या मिरच्या देणे जवळपास विक्रेत्यांनी बंद केले आहे. सध्या हिरवी मिरची १२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. शेवगाही १२० ते १४० रुपये किलो या दराने विकला जात आहे.
कोणत्या भाजीपाल्याचा काय दर?
भाजीपाला प्रकार होलसेल (प्रति किलो) किरकोळ (प्रति किलो)
शेवगा-८०- १२०
बटाटा-१२- २०
वांगे- ४०- ६०
कांदे-२०- ३५
हिरवी मिरची-९०- १२०
काकडी-२० - ४०
टोमॅटो-३०- ५०
कारले-५०- ८०
भेंडी-६०- ८०
गवार -१०० १२०
ढो. मिरची- ५५- ८०
पालेभाज्या मात्र स्वस्त
सध्याचे हवामान पालेभाज्यांच्या वाढीसाठी पोषक असल्यामुळे बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे, यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मागील काही दिवसांत वाढलेले दर खाली आले असून, मेथी, पालकची जुडी १० रुपयांना तर कांदापात १५ रुपये जुडी विकली जात आहे.