चांदोरीच्या रस्त्यांना लाभणार हिरवाईची किनार
By admin | Published: June 17, 2014 10:44 PM2014-06-17T22:44:02+5:302014-06-18T00:26:13+5:30
चांदोरीच्या रस्त्यांना लाभणार हिरवाईची किनार
कसबेसुकेणे : चांदोरी येथील रस्त्यांना आता हिरवाईची किनार लाभणार असून, शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड सप्ताह कार्यक्रमांतर्गत संपूर्ण गावात ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
या सप्ताहाचा प्रारंभ चांदोरी गावात नुकताच झाला. विभागीय आयुक्त पुरी, उपजिल्हाधिकारी गाडीलकर, विभागीय समन्वयक मोरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटविस्तार अधिकारी इंदिरा अस्वार, डॉ. विकास डावरे, चांदोरीचे सरपंच विजय बागस्कर, उपसरपंच पुष्कर हिंगणे यांच्या हस्ते झाला.
गोदावरी नदीच्या कुशीत वसलेल्या चांदोरी गावात शासनाची ही योजना काटेकोरपणे राबवून गाव हिरवाईने फुलविणार असून, ग्रामपालिका वृक्षांची जबाबदारीने पालनपोषण करेल, असे यावेळी सरपंच बागस्कर व उपसरपंच हिंगणे यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे, मंडल अधिकारी धाकराव आदिंसह सर्व ग्रामपालिका सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)