‘ग्रीन फिल्ड’मध्ये तोडगा निघेलच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:58 AM2019-06-08T00:58:33+5:302019-06-08T00:58:49+5:30
मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड योजनेसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सुरुवातील, असा विरोध असताच. परंतु योजनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तो विरोध मावळत जातो, त्यामुळे ग्रीन फिल्ड प्रकरणातही तोडगा निघेलच, असे मत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.
नाशिक : मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड योजनेसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सुरुवातील, असा विरोध असताच. परंतु योजनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तो विरोध मावळत जातो, त्यामुळे ग्रीन फिल्ड प्रकरणातही तोडगा निघेलच, असे मत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले. स्काडा मीटरच्या गाजलेल्या विषयाच्या अनुषंघाने त्यांनी कोणत्याही निविदाप्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे आणि अधिकाधिक स्पर्धा झाली पाहिजे, असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
स्मार्ट सिटी कंपनीची बैठक संचालकाच्या विरोधामुळे रद्द झाली. त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर मते मांडली. मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने ग्रीन फिल्ड प्रकल्प साकारण्यात येणार असून, त्याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र,जैतापूर प्रकल्प त्याचप्रमाणेच राज्य सरकारने अलीकडेच सुरू केलेला समृद्धी मार्ग या प्रकल्पांनाही विरोध झाला होता. परंतु नंतर मात्र शेतकºयांनी जमिनी दिल्या होत्या. स्मार्ट सिटी कंपनीचा नक्की प्रकल्प काय आहे आणि शेतकºयांना त्याची काय लाभ होणार आहे हे कळाल्यानंतर त्याचा विरोध कमी होईल, असे कुंटे म्हणाले. जमिनीचा मोबदला रोखीत द्या, अशी काही शेतकºयांची मागणी आहे, मात्र असे करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्काडा मीटरच्या वादासंदर्भात त्यांनी त्यात थेट काही घडलेले नाही. कारण निविदाप्रक्रियाच राबविली गेलेली नाही. परंतु त्यात बदल केले गेले त्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यास आपण सांगितले होते, असे त्यांनी नमूद केले. कोणतीही निविदाप्रक्रिया राबवितांना त्यात पारदर्शकता असली पाहिजे, त्याचप्रमाणे स्पर्धा वाढण्याच्या हेतुनेच काम केले गेले पाहिजे, असेही कुंटे म्हणाले.
वेबसाइटवर सर्व माहिती दिली पाहिजे
स्मार्ट सिटीच्या कामकाजात पारदर्शकता असली पाहिजे, कोणी काही माहिती मागितली तर ती देण्यास हरकत नाही विशेषत: जे निर्णय घेतले त्याची माहिती देण्यास काहीच हरकत नाही. कंपनीच्या बैठकीचे इतिवृत्तदेखील कंपनीच्या वेबसाइटवर टाकले पाहिजे, असेही सीताराम कुंटे यांनी सांगितले.