‘भोंसला’च्या देवतिब्बा शिखर मोहिमेला हिरवा झेंडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:18 AM2021-09-07T04:18:29+5:302021-09-07T04:18:29+5:30
नाशिक : समुद्र सपाटीपासून ६००१ मीटर उंची असलेले देवतिब्बा शिखर सर करण्यासाठी निघालेल्या भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या ७ प्रशिक्षित गिर्यारोहकांच्या ...
नाशिक : समुद्र सपाटीपासून ६००१ मीटर उंची असलेले देवतिब्बा शिखर सर करण्यासाठी निघालेल्या भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या ७ प्रशिक्षित गिर्यारोहकांच्या मोहिमेला संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर प्रस्थान केले.
देवतिब्बा हे पीर पंजाल रांगेतील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर मनालीजवळ कुल्लू जिल्ह्यात आहे. स्थानिकांची अशी मान्यता आहे की या शिखरावर देव जमतात. त्यामुळे त्याला देवतिब्बा शिखर असे म्हणतात. भोंसलाचे हे ७ प्रशिक्षित गिर्यारोहक या शिखरावर चढाई करणार आहेत. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित भोंसला ॲडव्हेंचर फाउंडेशनची ही मोहीम सर्व गिर्यारोहकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच या मोहिमेचा फायदा होईल. या मोहिमेत संतोष जगताप, सदस्य संतोष वाबळे, योगेश सहारे, सुजित पंडित, चैतन्य जोशी, विक्रम बेडकुळे, अजय परदेशी, वंदना कुलकर्णी, स्वराली सहस्रबुद्धे हे उपस्थित होते. जगताप यांच्यासह अन्य सदस्यांना मोहीम यशस्वीतेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे कार्यध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह दिलीप बेलगावकर, कॅप्टन डॉ. श्रीपाद नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे, सहकार्यवाह नितीन गर्गे, कोषाध्यक्ष शीतल देशपांडे, ॲडव्हेंचरचे अध्यक्ष ऋषिकेश यादव उपस्थित होते.