दळवटला ग्रामीण रु ग्णालय बांधकामास हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 02:18 PM2019-01-04T14:18:15+5:302019-01-04T14:18:29+5:30

कळवण : कळवण तालुक्यातील दळवट परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दळवट येथे ३० खाटांच्या ग्रामीण रु ग्णालयाच्या बांधकामास शासनाने हिरवा कंदील दिला आहे.

 Green Lantern to Grasshopper Rural Hospital | दळवटला ग्रामीण रु ग्णालय बांधकामास हिरवा कंदील

दळवटला ग्रामीण रु ग्णालय बांधकामास हिरवा कंदील

Next

कळवण : कळवण तालुक्यातील दळवट परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दळवट येथे ३० खाटांच्या ग्रामीण रु ग्णालयाच्या बांधकामास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. ग्रामीण रु ग्णालयाच्या मुख्य इमारत बाांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर या कामाची काही दिवसांपूर्वी निविदा निघाल्याने दळवट परिसरातील आदिवासी बांधवांनी स्वागत केले आहे. दळवट, बापखेडा, जिरवाडे, शेपुपाडा, कुमसाडी, धनोली, भांडणे, शिवभांडणे, वेरु ळे, अंबापूर, शिंगाशी, वीरशेत, मागीलदार, चाफापाडा, ततांनी, शृंगारवाडी, दरेगाव, भाकुर्डे, कोसुर्डे, जामले (हा) आदी भागांतील आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्या दळवट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवेत आहे. या भागातील आरोग्यविषयक प्रश्न आण िआरोग्य विभागाकडून दिली जाणारी सेवाबाबत या भागात गैरसोय होत असल्याने माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळातच ग्रामीण रु ग्णालयासाठी सरकारकडे मागणी केली होती.  आरोग्य सेवा संचालनालयाने दळवट ग्रामीण रु ग्णालय व मुख्य इमारत बांधकामाच्या १२ कोटी ६९ लाख ५४ हजार रु पयांच्या रकमेच्या अंदाजपत्रक व नवीन प्रशासकीय मान्यता, पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी, जागेची उपलब्धता, योग्यताबाबत आरोग्य विभागाने पाठपुरावा केल्याने इमारत बांधकामासाठी लागणार्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा, संचालक यांनी शासनास सादर केल्याने त्यास मंजुरी मिळाली आहे.

Web Title:  Green Lantern to Grasshopper Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक