ममदापूर येथील मेळाच्या बंधाऱ्याला हिरवा कंदील
By admin | Published: December 25, 2014 01:01 AM2014-12-25T01:01:58+5:302014-12-25T01:02:15+5:30
ममदापूर येथील मेळाच्या बंधाऱ्याला हिरवा कंदील
येवला : येथील पन्नास वर्षांपासून ग्रामस्थांनी विविध आंदोलने करून या बंधाऱ्यासाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्रासह सर्वच मान्यता मिळवून सहा कोटी ४७ लाखांचा निधीदेखील मंजूर केलेला असून, या कामाला वन विभागाकडून जमीन हस्तांतरण करणे एवढेच काम बाकी असताना, ममदापूर ग्रामस्थांच्या वारंवार मागणीला फळ मिळाले आहे.
ममदापूर परिसरात वनविभागाच्या हद्दीत ५४४७ हेक्टर क्षेत्रावर संवर्ध राखीव होणार असून यासाठी लागणारे ठराव देत्या वेळीच ममदापूर ग्रामस्थांनी ग्रामसभेत बंधाऱ्याला जागा सोडण्यासाठी तीव्र विरोध केला होता. त्यावेळी वनविभागाने बंधाऱ्यासाठी लागणारी जमीन सोडून इतर क्षेत्रावर संवर्ध राखीव करणार असल्याचे सांगितले होते.आण ित्यापद्धतीने अधिकारी पवार यांनी प्रत्यक्ष
मेळाच्या बंधार्याच्या ठिकाणी भेट देऊन अधिकार्यांना सूचना केल्याने ममदापूर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता पाटील, सोनकुसळे, शेळके, वनक्षेत्रपाल जाधव, सुद्रिक, वनपाल भालेराव, शिरसाठ, वाघ याच्यासह प्रकाश गोराणे, आबासाहेब केरे, दत्तत्रय वैद्य, भानुदास वैद्य, संजय कांदळकर यांच्यासह ग्रामस्थ हजर होते. (वार्ताहर)