ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांनाही हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 01:38 AM2021-12-11T01:38:05+5:302021-12-11T01:38:51+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविडमुक्त गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वाडी वस्तीवर गट समूहाने सुरू असलेल्या शाळा आता शासनाच्या सूचनांनुसार सोमवार (दि.१३) पासून नियमित सुरू होणार आहेत. यात पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गांचा समावेश असून, पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत,
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविडमुक्त गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वाडी वस्तीवर गट समूहाने सुरू असलेल्या शाळा आता शासनाच्या सूचनांनुसार सोमवार (दि.१३) पासून नियमित सुरू होणार आहेत. यात पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गांचा समावेश असून, पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत,
शालेय शिक्षण विभागाने १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली होती. परंतु, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने दि. १० डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आता शासन परिपत्रकातील सूचनांची पूर्तता करून शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठीही हिरवा कंदील मिळाला आहे. परंतु, शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना शासनाने केल्या असून, मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड-१९साठीची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.