माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओझरच्या विद्यालयात हरित शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 05:06 PM2021-01-01T17:06:21+5:302021-01-01T17:07:05+5:30

ओझर: येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत हरित शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाने नववर्षात माझी वसुंधरा अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणे हाती घेतलेले आहे. त्या निमित्ताने वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून ही शपथ घेण्यात आली.

Green oath at Ojhar's school under my Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओझरच्या विद्यालयात हरित शपथ

माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओझरच्या विद्यालयात हरित शपथ

googlenewsNext

नववर्षाच्या प्रथम दिवशी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा मूळ हेतू मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी स्पष्ट केला. यावेळी नववर्षानिमित्त उपस्थित कर्मचाऱ्यांना शालेय विविध संकल्प व उपक्रमांची माहिती देऊन शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच शिक्षक पंकज गोसावी यांनी दहा नवीन संकल्प उपस्थितांकडून वदवून घेतले. त्यात व्यायाम व योगासने, निसर्गप्रेम, गरजूंना मदत, व्यसनांवर मात, सकारात्मक दृष्टिकोन, मनाचे स्वास्थ्य, समाजमाध्यमांचा वापर कमी, नवीन स्थळांना भेटी, अपूर्ण राहिलेली ध्येय प्रत्यक्ष प्राप्त करणे, हास्य निर्माण, स्वयंशिस्त आदींचा समावेश होता. शिक्षिका चित्रा बाजारे यांनी नव वर्षावर आधारित कवितेचे सादरीकरण केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, पर्यवेक्षक शांताराम गायकवाड, रामनाथ रायते, सुनील पाटील, सतीश थेटे, बाळकृष्ण गायकवाड, उल्केश भोसले, मंगल सावंत, प्रतिभा खालकर, योगिनी पाटील, उज्ज्वला जाधव, उज्ज्वला निफाडे, मेघा शेजवळ, शीतल आहेर, अर्चना मोरे, नंदा जाधव, सीमा पाटील, अनिता भंडारे, ज्योती सातपुते, विजय शिंदे, विशाल कातकाडे, अशोक हळदे, अनिल काळे, माणिक बोरस्ते, भाऊसाहेब वाघ, खंडू हळदे, महेश जाधव आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, सूत्रसंचालन व आभार संगीता शेटे यांनी मानले.

Web Title: Green oath at Ojhar's school under my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.