हरतालिका उत्साहात ंं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:55 PM2018-09-12T15:55:50+5:302018-09-12T15:56:05+5:30
मनमाड : शहर व परिसरात महिला वर्गाकडून हरतालिका उत्साहात साजरी करण्यात आली.
भाद्रपद शुध्द तृतीया हा हरतालिका व्रताचा महत्वाचा दिवस.हरतालिकेचे व्रत करून पार्वतीने शंकराचे मन जिंकल्याची महती असेलला हा सण महिला श्रध्देचा उत्सव म्हणून ओळखला जातो. हरतालिके निमीत्त वाळू पासून तयार करण्यात आलेल्या महादेवाच्या पिंडीवर ॐ नम: शिवाय च्या मंत्र घोषात पाच फळे, पाच झाडांच्या पानांची पत्री वाहून पुजन करन्यात आले.या पत्री मधे बेलाच्या पानाला विशेष महत्व आहे.हरतालिकेच्या कहाणीचे पुजेसमोर वाचन करण्यात आले. पाच झाडांची पाने पत्री, फळे व पुजेचे साहीत्य अशा एकत्रीत पुजेसाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागल्याने हरतालीकेच्या पुजेवर महागाइ चे सावट दिसून आले.