शहरात घरोघरी हरितालिका पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 09:58 PM2020-08-22T21:58:06+5:302020-08-23T00:18:59+5:30
नाशिक : अमृतधाम व जेलरोड परिसरातही हरतालिकेच्या उत्सव महिलांनी छोट्या छोट्या ग्रुपने आपापल्या घरीच पूजा करून साजरा केला.
जेलरोड परिसरात हरितालिकेचे पूजन करताना महिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अमृतधाम व जेलरोड परिसरातही हरतालिकेच्या उत्सव महिलांनी छोट्या छोट्या ग्रुपने आपापल्या घरीच पूजा करून साजरा केला. हरतालिका पूजनाला महिलांच्या दृष्टीने मोठे महत्त्व असून, महिला यानिमित्ताने एकत्र येऊन मंदिरात जाऊन पूजा करतात आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा मात्र कोरोनामुळे महिलांनी पूजा करतांना सरकारी नियमांचे पालन केले.
देवळाली कॅम्प
एकमेकींना हळदी कुंकू देत आपल्या अखंड सौभाग्याचा मागणीसाठी महिलांकडून तर अनुरूप जोडीदार प्राप्तीसाठी तरुणींकडून हरतालिका व्रताची पूजाविधी करण्यात आली. मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे लोकडाऊन आणि मंदिरे बंद असल्यामुळे महिलांनी मंदिरा बाहेर व घरोघरी पूजा करण्यात आली. देवळालीच्या महिलांनी हरतालिका तृतीया हे व्रत केले.या व्रतादरम्यान देवी मंदिर बाहेर वाळूची शिवलिंग बनवत दिवसभर परिसरातील महिलांनी भगूरच्या देवी मंदिराबाहेर या व्रताचा संकल्प करीत व्रत पूर्ण केले. याशिवाय गवळीवाडा भागातील मनोकामनेश्वर महादेव मंदिर, सह्णाद्री नगर स्वयंभू महादेव मंदिर, लामरोड येथील भैरवनाथ मंदिर,माळावरच्या महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणांसह पंचक्रोशीतील महिलांची पूजेसाठी दिवसभर मंदिर बाहेर हरतालिका पूजे साठी गर्दी केली.
त्याचप्रमाणे शहराच्या विविध उपनगरांमध्येही महिलांनी हरितालिका व्रत केले. विविध मंदिरांमध्ये दरवर्षी होणारी गर्दी यंदा मात्र दिसली नाही.