हिरवाईने नटला इगतपुरी तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:56 PM2018-07-03T22:56:50+5:302018-07-03T22:57:23+5:30
घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात सातत्याने वरुणराजाची कृपावृष्टी होत असते. इगतपुरी तालुक्यातील निसर्गराजी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आलेली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे थळ घाट, भावली धरण परिसर, वैतरणा धरण परिसर आदी ठिकाणचे धबधबे प्रवाहित होऊ लागल्याने या भागात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. डोंगर-दºयांमुळे सुखावणाºया या वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मुंबई-ठाणे तसेच कोकण परिसरातून पर्यटक मोठ्या संख्येने इगतपुरी परिसरात येत असतात. विशेषत: शनिवार-रविवारी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पर्यटकांची मांदियाळी जमा झाल्याचे दिसून येते. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी पर्यटकांनी या परिसरात काजवा महोत्सवाचा आनंद लुटला. आता पावसाळ्यातील सुखावणारे वातावरण पर्यटकांना भुरळ पाडत आहे. युवकांना रोजगारयामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील डोंगर दºयांवर हिरवाईने शाल पांघरली असल्याने निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे. दरम्यान, धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांकडून थेट धबधब्याजवळ जाण्याचे प्रकार घडत आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.