आंबेडकर जयंती समितीतर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:00 AM2018-04-17T01:00:09+5:302018-04-17T01:00:09+5:30
परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पवननगर बसस्टॉपवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदप्रणित पवननगर शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती उत्सवप्रसंगी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते
सिडको : परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पवननगर बसस्टॉपवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदप्रणित पवननगर शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती उत्सवप्रसंगी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक व समता परिषदेचे शहर अध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी केले होते. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे, नगरसेवक नीलेश ठाकरे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, बाळासाहेब दराडे, अध्यक्ष बबलू सोनवणे, विशाल पगारे, रामदास जाधव, अतुल भामरे, अजय घुले, राजेंद्र शाह, धनंजय भावसार, आनंद सोनवणे, तुषार देवरे, मदन जमदाडे, राजू वराडे, धनाजी लगड, स्वप्नील पाटील, जिभाऊ बच्छाव, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान सम्यक विचार मंच, रमाई महिला मंच, सुनील जगताप मित्रमंडळ, भीमयोद्धा युवा फाउंडेशन, ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था सिडको, सम्राट सोशल ग्रुप, त्रिशरण बुद्ध विहार, सह्याद्रीनगर मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ वडाळा, हिंदूराजा मित्रमंडळ हनुमान चौक, सम्राट मित्रमंडळ, टेंभी नाका मित्रमंडळाद्वारे डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सार्वजनिक जयंती महोत्सव समिती
सिडको येथील उत्तमनगर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांना अभिवादन करताना आमदार अपूर्व हिरे, भाजपा नेते सुनील बागुल, आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक संजय साबळे, प्रकाश लोंढे, नगरसेवक श्याम साबळे, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, डी. जी. सूर्यवंशी, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, संजय भामरे, शीतल भामरे, दीपक मटाले, इक्बाल शेख, बाळा दराडे, मदन जमधाडे, शशी गरुड, सचिन आहिरे, विनोद केदार, आशिष मोरे, सागर दोंदे, तुषार दोंदे, बाळा साबळे, कुणाल तांदळे, संजय जाधव, जिभाऊ बच्छाव आदी उपस्थित होते.