शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:45 PM2018-01-23T23:45:04+5:302018-01-24T00:17:14+5:30

शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सीमा निगळ, गोकुळ निगळ, योगेश बेलदार सातपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.

Greetings to Balasaheb Thackeray in the city | शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

googlenewsNext

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सीमा निगळ, गोकुळ निगळ, योगेश बेलदार सातपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.  प्रभाग क्रमांक ८ मधील आनंदवली येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेवक राधाताई बेंडकुळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  प्रभाग क्रमांक ७ मधील अशोकस्तंभ येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सचिन मोरे, आनंद फरताळे, योगेश बेलदार, पिंटू छल्लानी, सतीश काळे, संतोष बोरसे, विशाल खैरनार आदी उपस्थित होते. इंदिरानगर येथे अवजड वाहतूक सेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी अजय बोरस्ते, संजय गायकर, आकाश खोडे, किशोर निकम, मनोज उदावंत, बापू वाटपाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय 
शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नाशिक महानगरच्या वतीने बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. कार्यालयात  बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, गटनेते विलास शिंदे, दीपक दातीर, सुनील गोडसे, नगरसेवक कल्पना पांडे, मंगला आढाव, रंजना बोराडे, सुवर्णा मटाले, नयना घोलप, अ‍ॅड. यतिन वाघ, संजय चव्हाण, मामा ठाकरे, शिवाजी भोर, राजू वाकसरे यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

Web Title: Greetings to Balasaheb Thackeray in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.