स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थान स्मारकाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:57+5:302021-05-29T04:12:57+5:30
नाशिक : भगूर येथील जन्मस्थान स्मारकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची १३८ वी जयंती अत्यंत साधेपणाने ...
नाशिक : भगूर येथील जन्मस्थान स्मारकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची १३८ वी जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी पुरातत्त्व विभागाचे सोमनाथ बोराडे यांच्या हस्ते सावरकर जन्मखोलीचे पूजन करण्यात आले. यावेळी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुरातत्त्व विभागाच्या वतीने शासकीय पूजा करण्यात आली. स्मारक फक्त पूजेसाठी उघण्यात येऊन बंद ठेवण्यात आले. यावेळी वीर सावरकर भगूर स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, संभाजी देशमुख, खंडू रामगडे, विजय घोडेकर, उपस्थित होते. तसेच सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौकातील वीर सावरकर व शिवाजी महाराज पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते प्रशांत कापसे, माजी पोलीस अधीक्षक रमेश पवार, प्रताप पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ सोनवणे, वसंत पाटील, पो.नि. शाम शिंदे, राजेंद्र बागडे, भरत चव्हाण उपस्थित होते.
दरवर्षी जयंतीच्या दिवशी या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केेले जाते. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कोणताही सार्वजनिक स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. स्थानिक नागरिकांना स्मारकाच्या बाहेरूनच स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे दर्शन घ्यावे लागले.
--इन्फो--
नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांमुळे भगूरच्या बाहेर असलेले भूमिपुत्र जयंतीच्या दिवशी आवर्जून जन्मभूमी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम नसल्याने तसेच स्मारकही बंद ठेवावे लागत असल्याने अनेकांना स्मारकात येता आलेले नाही. त्यामुळे अत्यंत साधेपणाने जयंती कार्यक्रम करावा लागत आहे. यंदा देखील तरुणांना स्मारकाच्या दर्शनासाठी येता आले नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली.
===Photopath===
280521\28nsk_40_28052021_13.jpg
===Caption===
भगुर सावरकर स्मारकात पुतळ्याच्या पुजनप्रसंगी सोमनाथ बोराडे.मनोज कुवर आदी