सज्जनांना सलाम अन् दुर्जनांवर प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:34+5:302021-09-16T04:20:34+5:30

--इन्फो--- तपास प्रशिक्षण कार्यशाळांंवर भर गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतदेखील बदलत चालली असून, त्यामुळे पोलिसांनीदेखील त्यांच्या तपासाची पद्धत अधिकाधिक बळकट ...

Greetings to the gentlemen and attack on the wicked | सज्जनांना सलाम अन् दुर्जनांवर प्रहार

सज्जनांना सलाम अन् दुर्जनांवर प्रहार

Next

--इन्फो---

तपास प्रशिक्षण कार्यशाळांंवर भर

गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतदेखील बदलत चालली असून, त्यामुळे पोलिसांनीदेखील त्यांच्या तपासाची पद्धत अधिकाधिक बळकट करण्याची गरज आहे. केवळ तांत्रिक विश्लेषणावरच अवलंबून न राहता गुन्ह्याची पद्धत समजावून घेत त्यादृष्टीने पारंपरिक तपासाचाही प्रयत्न पोलिसांनी करण्यावर भर दिल्यास गुन्हेगारांचा थांगपत्ता लवकर लागेल आणि तपासात खंड पडणार नाही, असेही शेखर यांनी यावेळी सांगितले. यासाठी पाचही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तपास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

--इन्फो--

नाकाबंदीचे स्वरूप अन् वेळा बदलणार

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक परिक्षेत्रात गुजरात, मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमा नाशिक, धुळे, नंदुरबारच्याहीजवळ आहेत. यामुळे या सीमावर्ती भागांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील नाकाबंदीचे स्वरूप आणि वेळा लवकरात लवकर बदलून नाकाबंदी पॉइंट अधिकाधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

--इन्फो--

नाशिक ड्रग्जमुक्त करण्याचा मानस

नाशिक परिक्षेत्र हे संपूर्णपणे ड्रग्जमुक्त करण्याचा मानस शेखर यांनी यावेळी संवादात बोलून दाखविला. कोरोनानंतर वाढलेली बेरोेजगारी व गुन्हेगारीचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. दरम्यान, व्यसनांच्या आहारी जाणारी तरुणपिढी सुरक्षित ठेवणेदेखील महत्त्वाचे असून, नाशिक परिक्षेत्रात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Greetings to the gentlemen and attack on the wicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.