सुखदेव शिक्षण संस्थेतर्फे १८ तास वाचनाद्वारे महापुरुषांना अभिवादन

By admin | Published: April 13, 2017 06:53 PM2017-04-13T18:53:16+5:302017-04-13T18:53:16+5:30

सुखदेव शिक्षण संस्थेतर्फे १८ तास वाचनाद्वारे महापुरुषांना अभिवादन

Greetings to the great men through 18-hour reading by Sukhdev Education Institute | सुखदेव शिक्षण संस्थेतर्फे १८ तास वाचनाद्वारे महापुरुषांना अभिवादन

सुखदेव शिक्षण संस्थेतर्फे १८ तास वाचनाद्वारे महापुरुषांना अभिवादन

Next

नाशिक : महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सुखदेव एज्युकेशन संस्थेतर्फे ‘१८ तास वाचन - एक अनोखी वाचनांजली’ उपक्र म राबविण्यात आला. महापुरु षांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्यावे ही अपेक्षा सर्वत्र व्यक्त होताना दिसते. हिच कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांच्या कल्पनेतून हा उपक्र म गुरु वारी (दि.१३) सकाळी ६ वाजता सुरू करण्यात आला. प्रारंभी संस्थाध्यक्ष रत्नाबाई काळे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपक्र माची सांगता १८ तासांनी रात्री १२ वाजता करण्यात येईल. संस्थेच्या सुखदेव प्राथमिक विद्यामंदिर, सुखदेव माध्यमिक व ज्युनियर कॉलेज आॅफ आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स इंदिरानगर, सुखदेव प्राथमिक आश्रमशाळा, विल्होळी शाखांमधील ११२ विद्यार्थी व ३५ शिक्षकांनी वाचनांजली उपक्र मात सहभाग घेतला. दिवसभरात विद्यार्थी व शिक्षकांनी महापुरु षांची पुस्तके, परदेश कथा, स्वातंत्र्याच्या कथा, भारतीय संस्कृती, संतांचा इतिहास, काव्यसंग्रह, वैज्ञानिक गोष्टी, वन्यजिवांविषयीची पुस्तके, वाक्यकोश, व्यक्तिमत्त्व विकास, धार्मिक, स्पर्धा परीक्षा आदि विविध पुस्तकांचे वाचन केले. वाचनांजली उपक्र मास संस्थेचे उपाध्यक्ष रंजय काळे, सरचिटणीस संजय काळे, चिटणीस विजय काळे, मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राचार्य बाबासाहेब खरोटे, मुख्याध्यापक हिरामण बारावकर, प्रकाश सोनवणे आदिंसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Greetings to the great men through 18-hour reading by Sukhdev Education Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.