गुरु-शिष्य भेटीचा मंगलमय सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:32 PM2020-01-18T22:32:50+5:302020-01-19T01:08:43+5:30

कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात वाहून घ्या, नामस्मरणाशिवाय मुक्तीची वाट सापडणार नाही, असा संदेश संतश्री सखाराम महाराज अमळनेरकर यांनी दिला.

Greetings for the Guru's Disciples Meeting ... | गुरु-शिष्य भेटीचा मंगलमय सोहळा...

मनमाड येथे आलेल्या दिंडीमध्ये सखाराम महाराज यांच्यासमवेत प्रसाद नाईक, गोपाल नगारे, सुनील खताळ, राजेंद्र जगताप, अमूल्य जोशी व वारकरी.

Next
ठळक मुद्देमनमाड । सखाराम महाराज दिंडीचे भाविकांकडून स्वागत

मनमाड : कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात वाहून घ्या, नामस्मरणाशिवाय मुक्तीची वाट सापडणार नाही, असा संदेश संतश्री सखाराम महाराज अमळनेरकर यांनी दिला.
पंढरपूर ते अमळनेर दिंडीचे सालाबादाप्रमाणे मनमाड शहरात आगमन झाले. यावेळी अनेक भाविकांनी दर्शनाचा
लाभ घेतला. ‘सखाराम महाराज की जय’च्या जयघोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गुरु-शिष्य भेटीच्या या मंगलमय
सोहळ्यामध्ये असंख्य भाविक सहभागी झाले होते.
श्री संत सखाराम महाराज यांचे उत्तराधिकारी व संस्थानचे अकरावे संत श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या दिंडीचे मनमाड शहरात आगमन झाले. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून रोषणाई करण्यात आली होेती. येथील किशोर नावरकर, विनोद देशमानकर, मुन्ना अहिरराव, प्रभाकर जोशी, हरिभाऊ ब्राह्मणकर, प्रशांत जोशी, गिरीश जोशी यांच्याकडे पानसुपारीच्या कार्यक्रमात असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दिंडीमध्ये पंढरपूर येथून आलेल्या पादुकांचे भाविकांनी मनोभावे पूजन केले. दत्तोपासक मंडळाने प्रासादिक भजन सादर केले. भगवतगीतेच्या अध्यायाबरोबरच विष्णू सहस्रनामाचे महत्त्व त्यांनी विशद केले. गुरु-शिष्य भेटीचा अनोखा सोहळा मनमाडकरांनी अनुभवला. महिला मंडळाने भजने सादर
केली. यावेळी प्रसाद नाईक, किशोर नावरकर, गोपाल नागरे, सुनील खताळ, राजेंद्र जगताप, अमूल्य जोशी, अनिल खताळ आदी भाविक उपस्थित होते.

Web Title: Greetings for the Guru's Disciples Meeting ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.