सिन्नर येथे आॅगस्ट क्र ांती दिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:57 PM2020-08-10T14:57:38+5:302020-08-10T14:58:25+5:30
सिन्नर : ९ आॅगस्ट क्र ांती दिन येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून साजरा करण्यात आला.
सिन्नर : ९ आॅगस्ट क्र ांती दिन येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून साजरा करण्यात आला.
इंग्रजांची सत्ता भारतातून जावी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ९ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला आणि आंदोलन सुरू झाले. देशात सर्वत्र इन्कलाब जिंदाबाद, भारतमाता की जयचा जयघोष सुरू झाला आणि सर्व भारतीय आझादीसाठी पेटून उठले. प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने यावेळी भूमिगत राहून हि देशव्यापी चळवळ चालविली गेली. देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांनी जीवाची बाजू लावून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. १५ आॅगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ह्यामुळे ह्या आंदोलनाला खूप महत्व आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देशात, राज्यात आणि शहरात १४४ कलम लागू असल्याने जास्त जमाव न जमवता सदर कार्यक्र म सामाजिक अंतर पाळत पार पडला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीतु कोथमिरे होते. सहाय्यक उपनिरक्षक गणेश परदेशी व संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक संतोष शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. सिन्नर नगरपरिषदेचे शहर अभियान व्यस्थापक अनिल जाधव, लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिटीच्या वतीने अध्यक्ष डॉ. महावीर खिंवसरा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ.महावीर खिंवसरा यांनी केले.