धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:04 IST2021-06-29T22:41:09+5:302021-06-30T01:04:52+5:30
येवला : तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी बाबासाहेब जेजुरकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
ठळक मुद्देया निमित्ताने शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
येवला : तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी बाबासाहेब जेजुरकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या निमित्ताने शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. उपसरपंच ज्ञानेश्वर वाळुंज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुयोग दीक्षित, प्रवीण बोढरे, बाबासाहेब जेजुरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन शिक्षक ज्ञानदेव नवसरे यांनी केले.