माळेगाव येथे क्रांतिकारकांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:23 PM2020-08-10T22:23:47+5:302020-08-11T01:18:35+5:30
पेठ : तालुक्यातील माळेगाव येथील शहीद आदिवासी क्रांतिकारक देवाजी राऊत यांच्या समाधीला आदिवासी गौरव व क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
पेठ : तालुक्यातील माळेगाव येथील शहीद आदिवासी क्रांतिकारक देवाजी राऊत यांच्या समाधीला आदिवासी गौरव व क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. समाधिस्थळावर महेश टोपले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेले देवाजी राऊत यांचे माळेगाव येथे स्मारक व्हावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. याप्रसंगी सभापती विलास अलबाड, रामदास वाघेरे, भिका चौधरी, दामू राऊत, रामदास गवळी, पूनम गवळी, पोलीसपाटील दौलत देशमुख यांच्यासह शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. शेवखंडी येथे पोलीसपाटील उत्तम चौधरी यांच्या हस्ते एका चौकाचे राघोजी भांगरे नामकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आंबादास भुसारे, आदिवासी विकास परिषद पेठ उपतालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गावीत, रामदास चौधरी, पुंडलिक भगरे, किरण झुरडे व गावकरी उपस्थ्ति होते.