मालेगावसह परिसरात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:10+5:302021-01-04T04:12:10+5:30

मराठी अध्यापक विद्यालय मालेगाव : कॅम्पातील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा येथे अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.डी. सूर्यवंशी होते. त्यांच्या ...

Greetings to Savitribai Phule in the area including Malegaon | मालेगावसह परिसरात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

मालेगावसह परिसरात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Next

मराठी अध्यापक विद्यालय

मालेगाव : कॅम्पातील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा येथे अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.डी. सूर्यवंशी होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य सोनवणे, यू. पी. झगडे, प्रा.एस. डी. अहिरे यांची भाषणे झाली. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.कविता पाटील यांनी केले. आभार प्रदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमास आर.आर. आहिरे, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मराठी अध्यापक विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी प्राचार्य व्ही.डी. सूर्यवंशी, यू.पी. झगडे, प्रा. एस.डी. अहिरे, डॉ.कविता पाटील, प्रदीप पाटील, आर. आर. आहिरे आदी.

आरबीएच कन्या विद्यालय

मालेगाव : आर.बी.एच. कन्या विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य अलका जोंधळे होत्या. त्यांनी प्रतिमा पूजन व मार्गदर्शन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास उपप्राचार्य सुचरिता ठाकरे, कीर्ती पवार, प्रमिला पाटील, पर्यवेक्षिका नुरजहाँ शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती व्ही. बी. पाटील यांनी तर आभार श्रीमती जे. सी. देवरे यांनी मानले.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०६ . जेपीजी

फोटो कॅप्शन : आरबीएच कन्या विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी मुख्याध्यापिका अलका जोंधळे, कविता खैरनार, सुचरिता ठाकरे आदी.

टीकेआरएच विद्यालय, निमगाव

मालेगाव : निमगाव येथील टी.के.आर.एच. विद्यालयात शिक्षक एन. एम. मांडवडे यांनी प्रतिमा पूजन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.जे. निकम होते. एस.एस. दाणी, मांडवडे, प्राचार्य निकम यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन इ. एल. कन्नोर यांनी तर आभार के. एस. पाटील यांनी मानले.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०७ . जेपीजी

फोटो कॅप्शन : निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी एस.एस. दानी, एन.एम. मांडवडे, के.एस. पाटील आदी.

सरस्वती विद्यालय सायने

मालेगाव : सायने येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सरचिटणीस अमित खरे यांची प्रतिमा पूजन केले. मुख्याध्यापक हेमंत खैरनार यांनी मार्गदर्शन केले.

सेवा इंग्लिश स्कूल, खाकुर्डी

मालेगाव : तालुक्यातील खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी उपशिक्षिका ए.डी. बच्छाव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक टी.जी. अहिरे होते. यावेळी उपशिक्षक पी.जी. उशिरे, आर.बी. निकम, डी.जी. पाटील यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक अहिरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व्ही.व्ही. कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन डी.बी. जगताप यांनी केले.

एलव्हीएच विद्यालय

मालेगाव : कॅम्पातील एल. व्ही. एच. विद्यालयात महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीमती एस. बी. खैरनार होते. मुख्याध्यापक दिनेश पवार यांनी प्रतिमा पूजन केले. आर.एस. खान, एस.एस. सूर्यवंशी, मुख्याध्यापक पवार, श्रीमती खैरनार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन श्रीमती बी.एम. अहिरे यांनी केले. के.आर. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

एज्युकेअर इंग्लिश मीडियम

मालेगाव : येथील एज्युकेअर इंग्लिश मीडियममध्ये महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शिल्पा देशमुख व वैशाली जैन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापिका जैन यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन काजल पटेल यांनी केले. कार्यक्रमास सृष्टी पाटील, अर्चना खैरनार, रूपाली पवार, मनिषा खैरनार, दुर्गेश्वरी दंडगव्हाळ, विशाल सावळे, अर्चना गायकवाड, स्नेहा परदेशी आदि उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०३ . जेपीजी

फोटो कॅप्शन : एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतिमा पूजनप्रसंगी शिल्पा देशमुख, वैशाली जैन, काजल पटेल, सृष्टी पाटील, अर्चना खैरनार, रूपाली पवार, मनिषा खैरनार आदि.

पंडित नेहरू विद्यालय, पाटणे

मालेगाव : तालुक्यातील पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुलोचना जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव मनपा स्थायी समिती सभापती राजाराम जाधव होते. यावेळी शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य आर. एस. अहिरे व शिक्षक उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : पाटणे येथील पंडित नेहरू विद्यालयात प्रतिमा पूजन करताना राजाराम जाधव. समवेत प्राचार्य आर. एस. अहिरे, सुलोचना जाधव आदी.

केबीएच विद्यालय, शेरूळ

मालेगाव : तालुक्यातील शेरूळ येथील के.बी.एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. मिसर होते. त्यांनी प्रतिमा पूजन केले. शिक्षक के. जी. बागुल, एस. के. पवार, एस. जे. बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बी. एस. वानखेडे यांनी आभार प्रदर्शन आर. पी. गर्दे यांनी केले.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०८ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील शेरुळ येथील के.बी.एच. विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी एन. के. मिसर, के. जी. बागुल, बी. एस. वानखेडे, आर. पी. गर्दे आदी.

व्हीबीएच विद्यालय, कळवाडी

मालेगाव : तालुक्यातील कळवाडी येथील व्यंकटराव हिरे माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी एस. टी. शेवाळे होते. त्यांनी व उपमुख्याध्यापक एस. डी. देवरे यांनी प्रतिमा पूजन केले. प्राचार्य के. डी. काकळीज यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती एस. आर. आहेर, कला शिक्षक नरेंद्र खैरनार, प्राचार्य के. व्ही. काकळीज यांची भाषणे झाली. के. डी. वाकळे यांनी सूत्रसंचालन केले. आर. यू. वाघ यांनी आभार मानले.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०९ . जेपीजी

फोटो कॅप्शन : कळवाडी येथील व्ही. बी. एच. विद्यालयात प्रतिमा पूजन करताना एस. के. शेवाळे, एस. बी. देवरे, प्राचार्य के. व्ही. काकळीज आदी.

केबीएच विद्यालय, कॅम्प

पाटणे : मालेगाव कॅम्पातील के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अध्यक्षस्थानी शिक्षिका तृप्ती पवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अनिल पवार व उपप्राचार्य सुनील बागुल, पर्यवेक्षक विलास पगार, संतोष सावंत, संजय सूर्यवंशी, पुष्पा मोरे, पुष्पा वाघ, रोहिणी ठोके, मनिषा आहेर, कामिनी शेलार उपस्थित होते. पुष्पा मोरे, तृप्ती पवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. राजेश धनवटे यांनी आभार मानले. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सार्थक अमृतकर - प्रथम, चेतन अहिरे - द्वितीय, योजित अहिरे - तृतीय तर भावेश सावळे व देव खैरनार यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

फोटो फाईल नेम : ०३ एमजेएएन ०५ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित प्राचार्य अनिल पवार, तृप्ती पवार, सुनील बागुल, रवींद्र शिरोडे, पुष्पा मोरे, रोहिणी ठोके आदी.

Web Title: Greetings to Savitribai Phule in the area including Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.