सागरा प्राण तळमळला़ गीतातून अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:37 PM2019-05-29T23:37:50+5:302019-05-30T00:15:25+5:30
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़
नाशिक : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़
भगूर येथील सावरकरांच्या जन्मभूमी स्मारकात चारुदत्त दीक्षित यांचा बागेश्री निर्मित ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी खासदार हेमंत गोडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते़ प्रारंभी बागेश्री वाद्यवृंदातील बालगायिका कलावंत जान्हवी पाटील व श्रेया गायकवाड यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला़ राष्टÑप्रेम जागृत करणारी गाणी गायक राजेंद्र सराफ, दीपक दीक्षित यांनी सादर केली़ त्यांना जान्हवी पाटील, कल्पना व्यवहारे, उज्ज्वल शिंदे, सुवर्णा पाटील, श्रेया गायकवाड यांनी सहगायनाची सुरेख साथ केली़ निर्मिती संकल्पना चारुदत्त दीक्षित यांची होती़ निवेदिका वृषाली घोलप यांनी सावरकरांच्या जीवन प्रवासातील प्रसंग कथन केले़
विविध गीतांना चारुदत्त दीक्षित (संवादिनी), अभिजित वैद्य (तबला), ऋषिकेश गायकवाड (तालवाद्ये) यांनी साथ संगत केली़ याप्रसंगी एकनाथ शेटे, डॉ़ मृत्युंजय कापसे, प्रतापराव गायकवाड, प्रफुल्ल चव्हाण, विलास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते़
भगूरला विविध कार्यक्रम
येथील नाशिक एज्युकेशन संचलित ति. झं. विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ, सुगंधा समिती भगूर शाखेच्या वतीने मुलींसाठी सॅनेटरी नॅपकिन (व्हेंडिंग) मशीन मोफत उपलब्ध करून दिले. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. भगूर शाखेच्या वतीने प्रकल्प प्रमुख नलिनी भट्टड यांनी या उपक्र माची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका प्रियंका निकम, मंडळाच्या कोषाध्यक्षा सुवर्णा मानधने, किरण लोया, प्रतिभा कासट, अलकनंदा लोया, प्रियंका निकम, अनिता लोया, लीला लाहोटी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन नरेंद्र मोहिते यांनी तर आभार शिक्षक प्रतिनिधी शिवाजी सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी अशोक लोया, संजय लाहोटी, अमोल सोनवणे, भरत भलकार, सुनील शेटे, चिमाजी सापटे, संजय भांगरे आदी उपस्थित होते.