सटाण्यात शरद जोशी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:38 PM2020-09-03T22:38:04+5:302020-09-04T00:45:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी यांची चळवळ बागलाणमध्ये फोफावली म्हणून बागलाणमधील प्रयोगशील शेतकऱ्याला दिशा मिळाली आणि संपूर्ण देशात बागलाणने नावलौकिक मिळवला, असे उद्गार आमदार दिलीप बोरसे यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी यांची चळवळ बागलाणमध्ये फोफावली म्हणून बागलाणमधील प्रयोगशील शेतकऱ्याला दिशा मिळाली आणि संपूर्ण देशात बागलाणने नावलौकिक मिळवला, असे उद्गार आमदार दिलीप बोरसे यांनी काढले.
येथील आमदार संपर्क कार्यालयात शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी आमदार बोरसे यांनी कै.जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा होते. आमदार बोरसे म्हणाले की, बागलाणचे शेतकरी जोशींच्या विचाराने प्रेरित झाल्यामुळेच शेतीत क्रांती झाली. आजच्या तरुण शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेती करताना जोशींच्या विचारांचा अवलंब करावा, असे आवाहन आमदार बोरसे यांनी केले. याप्रसंगी दिलीप चव्हाण, रोहित शिंपी, जगदीश भामरे, विनोद अहिरे आदी उास्थित होते.