सिन्नर नगरपरिषदेतर्फे शिवरायांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:28+5:302021-02-20T04:40:28+5:30

माजी आमदार राजाभाऊ वाजे, गटनेते हेमंत वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख हस्ते ...

Greetings to Shivaraya from Sinnar Municipal Council | सिन्नर नगरपरिषदेतर्फे शिवरायांना अभिवादन

सिन्नर नगरपरिषदेतर्फे शिवरायांना अभिवादन

Next

माजी आमदार राजाभाऊ वाजे, गटनेते हेमंत वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सिन्नर नगरपरिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी संजय केदार, नगरसेवक सुजाता तेलंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी मविप्रचे माजी संचालक कृष्णाजी भगत, नगरसेवक रामभाऊ लोणारे, विजय जाधव, संतोष शिंदे, श्रीकांत जाधव, गोविंद लोखंडे, मल्लू पाबळे, पंकज मोरे, रुपेश मुठे, सुजाता भगत, प्रतिभा नरोटे, सुजाता तेलंग, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, मालती भोळे, विजया बर्डे, मनोज भगत, गौरव घरटे, पंकज जाधव, सिन्नर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, कर निरीक्षक सचिन कापडणीस, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, लेखापाल विष्णू हाडके, विद्युत अभियंता अशोक कटारे, कैलास शिंगोटे, मणिलाल चौरे, दीपक भाटजिरे, दामू भांगरे, राकेश शिंदे, रोषण चव्हाण, निवृत्ती चव्हाण, राहुल आहेर, सचिन वारुंगसे, भानुदास घोरपडे, गोरख वाघ, ज्ञानेश्वर घेगडमल, अर्फात अत्तार, ताहीर शेख, दीपक पगारे आदी उपस्थित होते.

चौकट-

सिन्नर वाचनालय

येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, विजय जाधव, सागर गुजर यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व वाचक उपस्थित होते.

चौकट-

प्रहार संघटनेकडून संगीत भजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षातर्फे संगीत भजन कार्यक्रम पार पडला. संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुरू संत तुकाराम महाराज व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शक्ती व भक्ती यांचा मिलापाचा संदेश देण्यासाठी भजन कार्यक्रम आयोजित केला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व शरद शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवजयंतीच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन अपंगांना व्हील चेअर व सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी छत्रपतींना दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष दौलत धनगर, संदीप लोंढे, सुनील महाराज, शिवाजी गुंजाळ, गणपत नाठे, बापू सानप , जयदेव मानेकर,ज्ञानेश्वर वनवे, गणेश सानप, नामदेव चिने यांच्यासह कार्यकर्ते व वारकरी उपस्थित होते.

फोटो - १९ सिन्नर नगरपरिषद

सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी राजाभाऊ वाजे, किरण डगळे, हेमंत वाजे, बाळासाहेब उगले, संजय केदार, गोविंद लोखंडे, रामभाऊ लोणारे, कृष्णाजी भगत, पंकज मोरे, भाऊसाहेब शिंदे, मल्लू पाबळे, रुपेश मुठे, सुजाता भगत, प्रतिभा नरोटे, सुजाता तेलंग, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, मालती भोळे, विजया बर्डे यांच्यासह पदाधिकारी.

===Photopath===

190221\19nsk_35_19022021_13.jpg

===Caption===

फोटो - १९ सिन्नर नगरपरिषद सिन्नर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी राजाभाऊ वाजे, किरण डगळे, हेमंत वाजे, बाळासाहेब उगले, संजय केदार, गोविंद लोखंडे, रामभाऊ लोणारे, कृष्णाजी भगत, पंकज मोरे, भाऊसाहेब शिंदे, मल्लू पाबळे, रुपेश मुठे, सुजाता भगत, प्रतिभा नरोटे, सुजाता तेलंग, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, मालती भोळे, विजया बर्डे यांच्यासह पदाधिकारी. 

Web Title: Greetings to Shivaraya from Sinnar Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.