सिन्नरला क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 05:56 PM2019-06-11T17:56:32+5:302019-06-11T17:56:45+5:30
सिन्नर : क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या ११९ व्या स्मृती दिनानिमीत्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिवाजी चौकात त्यांना अभिवादन करण्यात आले.
ॅ
सिन्नर : क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या ११९ व्या स्मृती दिनानिमीत्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिवाजी चौकात त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता वायचळे होते. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. बिरसा मुंडाने आदिवासींना एकत्रित करून त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणिव करून दिली. बिरसा यांनी ब्रिटीश सरकार विरोधात ‘उलगुलान’ आंदोलन सुरू केले. जल, जमीन, जंगल यांच्यावर आदिवासींचा अधिकार आहे, तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितल्याचे वायचळे यांनी सांगितले. विजय मुठे यांनी सूत्रसंचलन केले. तर रामू इदे यांनी प्रास्तविक व घनशाम देशमुख यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी देशमुख, सुभाष चव्हाण, रामदास शिरसाट, गणपत वाघ, राजेंद्र जाधव, सुधाकर घोरपडे, मधुकर कोकाटे, सुभाष परदेशी, राजेंद्र सातपुते, सोमनाथ लोहारकर, विठ्ठल जाधव, राजेंद्र देशमुख, धनंजय परदेशी, तुकाराम गीते, गणपत काळे आदींसह नागरिक उपस्थित होते.