स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:02 AM2018-05-30T00:02:05+5:302018-05-30T00:02:05+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती.
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती. यावेळी ग्रह, तारे व अवकाशाची माहिती नासाच्या सदस्य अपूर्वा जाखडी यांनी दिली. महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी, सावरकर जयंतीचे औचित्य साधून मुलांसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास मंडळाचे प्रकाश दीक्षित, ज्ञान प्रबोधिनीचे नेरकर, प्रदीप येवला, दिनेश मानभाव, मोहन मानभाव, राजेंद्र आपटे, तातेड तसेच भाजपाचे देवदत्त जोशी, नंदू देसाई, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
भाजपा पंचवटी मंडलातर्फे जयंती साजरी
भाजपा पंचवटी मंडलाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती स्वामिनारायणनगर येथील सावरकर स्मारकात साजरी करण्यात आली. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरांनी आपल्या भाषणातून सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी पंचवटी प्रभाग सभापती पूनम धनगर, सुरेश खेताडे, नाना शिंदे, सोमनाथ बोडके, श्याम पिंपरकर, दिगंबर धुमाळ, मोहिनी भगरे, प्रियंका कानडे, गायत्री पाठक, महेश महंकाळे, रोहिणी दळवी, अंजू अभंगराव, मनोरमा पाटील, नामदेव हिरे, दीपक सानप, ऋ षिकेश अहेर, सुनील वाघ, संदीप जोशी, सुनील फरताळे, विलास कारेगावकर, कैलास आंबेकर आदी उपस्थित होते.