दापूर विद्यालयात उमाजी नाईक यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 10:54 PM2019-09-08T22:54:35+5:302019-09-08T22:55:03+5:30
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विश्वनाथ मचकुले, मुख्याध्यापक जी.बी. देसाई, स्थानिक सल्लागार समिती सदस्य भाऊसाहेब कांदे, पर्यवेक्षक बी.बी. गुंजाळ यांच्या हस्ते क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक प्रकाश शिरसाट, ए.बी. सय्यद, पी.टी. चौधरी, एम.पी. शिरसाट, सांस्कृतिक प्रमुख सतीश पावरा आदींनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
१८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्टÑातील निधड्या छातीचा वीर आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांच्याप्रति मुख्याध्यापक देसाई यांनी प्रासंगिक घटनाक्रम विद्यार्थ्यांसमोर मांडला. भाऊसाहेब कांदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत वाळुंज यांनी आभार मानले.