कळवणमध्ये मिळणार घरपोच किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:26 PM2020-03-28T15:26:00+5:302020-03-28T15:34:56+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोच दिला जाणार आहे. कळवण नगरपंचायतीकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन माने यांनी दिली.
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोच दिला जाणार आहे. कळवण नगरपंचायतीकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन माने यांनी दिली.
बंद काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. कळवण शहरातील विविध भागात किराणा व्यवसायिक आहेत. त्यांना शहर व परिसरातील ग्राहकांना माल पुरविण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. नगरपंचायतीने घरपोच किराणा देणाऱ्या किराणा दुकानदारांची यादी भ्रमणध्वनी नंबरसह प्रसिद्ध केली असून ती यादी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. कळवणकर नागरिक आपल्या भागातील दुकानदाराकडे व्हॉट्स अॅपद्वारे किंवा फोन करु न किराणा मालाची मागणी करतील. त्यानुसार ते माल पॅक करून तो वाहनातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोच करतील असे नियोजन सुरू आहे.