तुरीसाठी पोते शिलाई यंत्राचा खर्च खरेदी संघाच्या माथी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:08 PM2018-02-01T15:08:05+5:302018-02-01T15:10:20+5:30

यंदा शासनाने आधारभुत किंमतीत तुर खरेदी करतांना मक्याप्रमाणे तुर खरेदीसाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तुर खरेदी करण्याबरोबरच खरेदी केलेल्या तुरीचे पोते सुतळीने शिवण्याऐवजी पोते शिलाई यंत्राच्या सहाय्याने

Grooming for Shrinking Equipment for the Purchase Team! | तुरीसाठी पोते शिलाई यंत्राचा खर्च खरेदी संघाच्या माथी !

तुरीसाठी पोते शिलाई यंत्राचा खर्च खरेदी संघाच्या माथी !

Next
ठळक मुद्देनकार : तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात अडचणी तुरीचे पोते सुतळीऐवजी यंत्राच्या सहाय्याने शिवण्याचा निर्णय

नाशिक : खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणा-या तुरीचे पोते सुतळीऐवजी यंत्राच्या सहाय्याने शिवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन पोते शिलाई यंत्र खरेदीचा खर्च तालुका खरेदी-विक्री संघाच्या माथी मारल्यामुळे अगोदरच सरकारकडून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले येणे मिळत नसल्याने त्यात यंत्र खरेदीचा खर्च उचलण्यास संघांनी नकार दिला आहे, परिणामी जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून सुरू होणारे आधारभुत किंमतीचे तुर खरेदी केंद्रे सुरू होण्याचा मुहूर्त टळला आहे.
यंदा शासनाने आधारभुत किंमतीत तुर खरेदी करतांना मक्याप्रमाणे तुर खरेदीसाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तुर खरेदी करण्याबरोबरच खरेदी केलेल्या तुरीचे पोते सुतळीने शिवण्याऐवजी पोते शिलाई यंत्राच्या सहाय्याने पोते शिवून, त्यावर तुरीची प्रत, विक्री करणा-या शेतक-याचे ओळखपत्र आदी माहितीची चिठ्ठी लावण्याचे ठरविले आहे. ही सारी कामे खरेदी-विक्री संघाने करायची आहेत. त्यामोबदल्यात खरेदी-विक्री संघाला काहीच मिळणार नाही. मुळात गेल्या वर्षी खरेदी-विक्री संघाने तुर खरेदी केली असता, त्याचे कमिशनही अद्याप शासनाने दिले नाही, उलट हमाली मिळविण्यासाठी खरेदी-विक्री संंघांना शासनाच्या दरबारी खेटा घालाव्या लागल्या होत्या. त्यामुळे आता तुर खरेदीसाठी शिलाई यंत्र खरेदी करण्याचा खर्च उचलण्यास संघांनी नकार दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दहा-बारा पोते शिवण्यासाठी यंत्र घेणे परवडत नसून, शासनाने त्याचा खर्च द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
 

Web Title: Grooming for Shrinking Equipment for the Purchase Team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.